-
हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या तारखेला मकर संक्रांती म्हणून साजरी केली जाते.
-
या दिवशी हिंदू धर्मात, सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते.
-
तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात, अशी मान्यता आहे.
-
अवधूत शेंभेकर गुरुजी यांनी लोकसत्ताला याबाबत दिलेल्या माहितीनुसार संक्रातीचा पुण्यकाळ सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत असेल.
-
धार्मिक मान्यतांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल तर लवकरच त्याचे चांगले भाग्य सुरू होऊ शकते.
-
मकर या शनीच्या राशीमधील सूर्याचा प्रवेश अनेक राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि कौटुंबिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम देऊ शकतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया.
-
सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळू शकते. तसेच करिअरमध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होऊ शकतात.
-
नोकरी करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. इतकेच नाही तर परदेशात जाण्याचीही शक्यता असेल. जोडीदाराशी प्रामाणिक राहाल.
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहपरिवर्तन फायदेशीर ठरू शकते. त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.
-
परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ यश देऊ शकतो. गुंतवणुकीतून चांगला नफा होण्याची शक्यता आहे. तसेच जोडीदाराबरोबरचे नाते सकारात्मक राहील.
-
सिंह राशीच्या लोकांना चांगले यश आणि मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळू शकते.
-
स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या लोकांसाठी ही वेळ फायदेशीर ठरू शकते. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामातून यश आणि मानसन्मान मिळू शकतो.
-
वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयातनातून यश मिळू शकते. कामानिमित्त केलेल्या प्रवासातून फायदा होऊ शकतो. भागीदाराबरोबरचे संबंध दृढ होऊ शकतात.
-
मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. तसेच नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
-
काही गोष्टी अशा घडू शकतात ज्यामुळे या लोकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो, मात्र या गोष्टीतून आनंदही मिळू शकतो.
-
मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवण्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. तसेच जोडीदाराशी नाते घट्ट होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos : freepik)
Photos: ‘या’ राशीच्या लोकांसाठी यंदाची मकरसंक्रांत ठरणार गोड? आर्थिक लाभासह प्रगतीचे मार्ग उघडू शकतात
मकर या शनीच्या राशीमधील सूर्याचा प्रवेश अनेक राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि कौटुंबिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम देऊ शकतो.
Web Title: Will this year makar sankranti 2024 be sweet for the people of these zodiac sign may open avenues of advancement with financial gain pvp