-
प्रत्येकाला पांढरे दात हवे असतात. दात हे आपले हास्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत. (Freepik)
-
दैनंदिन खाण्याच्या सवयी आणि स्वच्छतेच्या सवयींचा अनेकदा दातांच्या रंगावर परिणाम होतो. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (Freepik)
-
पण, टूथपेस्टच्या वापरानेही अनेकांना दात पिवळे पडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुमच्या दातांची चमक परत मिळवू शकता. (Freepik)
-
चला तर मग जाणून घेऊया दात स्वच्छ आणि पांढरे ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय. (Freepik)
-
एक चमचा खोबरेल तेल तोंडात पंधरा ते वीस मिनिटे ठेवा. नंतर ते ब्रश करा. या उपायाने दातांमधील जंतू कमी होऊन दात पांढरे राहण्यास मदत होईल. (Freepik)
-
बेकिंग सोडा आणि ताज्या लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट काही वेळा दातांवर लावल्यानंतर व्यवस्थित धुवा. लिंबाच्या आंबटपणासह बेकिंग सोडा दातांवरील पिवळे डाग काढून टाकण्यास मदत करेल. (Freepik)
-
रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशच्या मदतीने दातांवर हळद पावडर लावा आणि काही मिनिटांनी धुवा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होऊ शकतो. (Freepik)
-
अॅपल सायडर व्हिनेगर दात स्वच्छ करण्यासाठी आणि पिवळे दात काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. (Freepik)
-
स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि एक चमचा बेकिंग सोडा यांची पेस्ट बनवा. स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड पिवळे दात हलके करण्यास मदत करू शकते. (Freepik)
-
स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि एक चमचा बेकिंग सोडा यांची पेस्ट बनवा. स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड पिवळे दात हलके करण्यास मदत करू शकते.
-
ऍपल सायडर व्हिनेगर दात स्वच्छ करण्यासाठी आणि पिवळे दात काढण्यासाठी खूप प्रभावी आहे.
रोज घासल्यानंतरही दात पिवळे दिसतात? ‘हे’ घरगुती उपाय करतील काम
टुथपेस्टचा वापर करूनही अनेकांना दात पिवळे पडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करून तुमच्या दातांची चमक परत मिळवू शकता.
Web Title: Teeth cleaning tips home remedies health tips ieghd import pvp