-
हिवाळा सुरू होताच त्वचा अधिक कोरडी होऊ लागते. त्वचेवर काहीच न लावल्यास ती पांढरट आणि रुक्ष दिसू लागते. अनेकदा अशावेळेस त्वचेला खाजही सुटते.
-
म्हणूनच हिवाळ्यात त्वचेला क्रीम, लोशन किंवा मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
-
पण, जेव्हा आपण क्रीम लावतो तेव्हा त्वचेचा रंग थोडा निस्तेज दिसू लागतो. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे त्वचा काळी पडते.
-
तसेच मॉइश्चरायझर, बॉडी क्रीम, बॉडी लोशनचा खर्चही अधिक असतो. त्यामुळे बरेच लोक ते वापरणे टाळतात.
-
आज आपण घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने बॉडी लोशन कसे बनवायचे, ते जाणून घेऊया.
-
एका स्वच्छ भांड्यात एक चमचा गुलाबजल, ५०मिलि ग्लिसरीन, एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल घ्या. या गोष्टी नीट एकत्रित करून घ्या आणि याचा नियमित वापर करा.
-
बॉडीलोशन लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे अंघोळीनंतर. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेचा कोरडेपणा वाढतो. पण, जर अंघोळीनंतर लगेच बॉडीलोशन लावले तर त्वचेतील आर्द्रता नष्ट होण्यापासून रोखता येऊ शकते.
-
त्वचेची चांगली काळजी घेण्यासाठी आणि हायड्रेशन देण्यासाठी, तुम्ही दिवसातून किमान दोनदा बॉडीलोशन लावावे. प्रथम, अंघोळीनंतर आणि दुसरे रात्री झोपण्यापूर्वी. असे केल्याने तुमची त्वचा कोरडी होणार नाही.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो : फ्रीपिक)
त्वचा रुक्ष होते, पण केमिकलयुक्त क्रीम लावण्याची भीती वाटते? मग आता घरच्या घरी तयार करा नैसर्गिक मॉइश्चरायझर
आज आपण घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने बॉडी लोशन कसे बनवायचे, ते जाणून घेऊया.
Web Title: Do you have dry skin but afraid to apply chemical creams so now prepare a natural moisturizer at home pvp