Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. marathi ukhane for marriage wedding special ukhane list for bride know ukhane ideas ndj

Ukhane : महिलांनो, उखाणे येत नाही? जाणून घ्या तुमच्या रावासांठी घ्या एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, लिस्ट एकदा पाहाच

लग्नाच्या वेळी नवरी किंवा नवरदेव आवडीने जोडीदाराचे नाव घेतात.विशेषत: नवीन नवरीला उखाणा घेण्यासाठी खूप आग्रह केला जातो. आज आपण असेच काही हटके उखाणे जाणून घेणार आहोत.

February 3, 2024 09:25 IST
Follow Us
  • जाणून घ्या तुमच्या रावासांठी घ्या एकापेक्षा एक भन्नाट उखाणे
    1/9

    लग्न ही दोन व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याला सुरूवात करतात. (Photo : Social Media)

  • 2/9

    सध्या लग्न समारंभ जोरदार सुरू आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे त्यामुळे लग्न समारंभ साजरा करताना अनेकदा विविधता दिसून येते. महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यात उखाणा हा सर्वात महत्त्वाचा असतो. (Photo : Social Media)

  • 3/9

    आता तुम्हाला प्रश्न पडला असेल उखाणा म्हणजे काय? लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे म्हणजे म्हणजे उखाणा घेणे होय. लग्नाच्या वेळी नवरी किंवा नवरदेव आवडीने जोडीदाराचे नाव घेतात.
    विशेषत: नवीन नवरीला उखाणा घेण्यासाठी खूप आग्रह केला जातो. आज आपण असेच काही हटके उखाणे जाणून घेणार आहोत. (Photo : Social Media)

  • 4/9

    १. कुंकवाचा साज, असाच हवाय
    ७ जन्मी ……राव नवरा म्हणून हवाय
    २. नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
    ……….राव आहे माझे सर्वस्व (Photo : Social Media)

  • 5/9

    ३. चंदनी पानात मुग्ध कळी हसली
    … लग्नाच्या दिवशी कबूल करते, रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
    ४. ……..रावांसोबत मी खेळते दररोज रुसवा फुगव्याचा गेम,
    आयुष्यभर असंच आमचं प्रेम राहो सेम (Photo : Social Media)

  • 6/9

    ५. डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
    …… रावांना पहिल्यांदा पाहताच मला झाला होता लवेरिया
    ६. गोड करंजी सपक शेवाई
    ………राव होते समजूतदार म्हणून घरच्यांनी करून घेतले जावई (Photo : Social Media)

  • 7/9

    ७. नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
    …….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात
    ८. नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
    मोदी असो की गांधी फरक पडत नाही
    …… राव आहे माझं खरं सरकार (Photo : Social Media)

  • 8/9

    ९. साखरेचे पोते सुई ने उसवले,
    …………रावांनी मला पावडर लाऊन फसवले
    १० …….. राव आहे माझे बॅकबोन
    त्यांना आवडते दिपिका पदूकोन (Photo : Social Media)

  • 9/9

    ११. ………रावांना जॉबवरुन यायला वाजतात तीन
    ते आहेत माझे किंग आणि मी आहे त्यांची क्वीन
    १२. वन बॉटल टू ग्लास, ………. राव आमचे फर्स्ट क्लास (Photo : Social Media)

TOPICS
लग्नMarriageलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Marathi ukhane for marriage wedding special ukhane list for bride know ukhane ideas ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.