-
घरातील गुळ- साखरेच्या डब्ब्याला अनेकदा हमखास लाल मुंग्या येतात. यात उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला मुंग्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. किचनमधील सिंकच्या आजाबाजूला, ओट्यावर या मुंग्यांची रांग लागलेली दिसते.
-
काहीवेळी या मुंग्या अगदी बारीक असतात तर काहीवेळा मोठ्या लाल चावणाऱ्या मुंग्या असतात. अशावेळी कीटकनाशके वापरत आपण मुंग्यांपासून सुटका करु घेतो. पण पुन्हा या मुंग्या येतात.
-
अशावेळी आम्ही तुम्हाला घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय सोपे ४ घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे घरात पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही. चला तर मग जाणून घेऊ…
-
डिश वॉश आणि पाणी : एका बाटलीत तुम्ही डिश वॉश आणि काहीप्रमाणात पाणी घ्या. यानंतर हे मिश्रण नीट शेक करा. आता घरात ज्याठिकाणी मुंग्यांची रांग लागली आहे तिथे स्प्रे करा, यामुळे मुंग्या काही क्षणात गायब होतील.
-
व्हाईट व्हिनेगर आणि पाणी : पाण्यात व्हाईट व्हिनेगर टाकून तुम्ही मुंग्यांवर स्प्रे करण्यासाठी एक कीटकनाशक बनवू शकता. यासाठी एक स्प्रे बाटलीत अर्धा कप पाणी आणि अर्धा कप व्हाईट व्हिनेगर टाका आणि ते मुंग्यांवर स्प्रे करा.
-
लिंबाचा रस आणि पाणी: जर तुम्हाला व्हिनेगरचा वास आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस आणि पाणी हे मिश्रणही मुंग्या दूर करण्यासाठी वापरु शकता.
-
बोरिक ऍसिड : हे मुंग्यांसाठी विष म्हणून काम करते. ज्यामुळे मुंग्या काही क्षणात मरतात. ज्याठिकाणी जास्त मुंग्या दिसतात तिथे हे स्प्रे करा. याशिवाय बोरिक ऍसिड शुगर ट्रॅप देखील बनवू शकता.
-
यासाठी बोरिक ऍसिडमध्ये शुगर सिरप मिक्स करा आणि कार्डबोर्डवर टाका, या कार्डबोर्डवर मुंग्या येतात मरुन जातील.
-
लाल मुंग्या खूप वेगाने चावतात. त्यामुळे त्यांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी लाल मिरची, दालचिनी आणि लिंबाची साल ठेवा. याशिवाय मुंग्या तेलापासून दूर पळतात.
-
यामुळे एक कप पाण्यात तेलाचे 10 थेंब मिसळा आणि हे द्रावण घराच्या आत आणि बाहेर स्प्रे करा. ज्यामुळे मुंग्या घरातून काही मिनिटांत गायब होतील. (सर्व फोटो – freepik, unsplash)
घरातील लाल मुंग्या काही मिनिटांत होतील गायब; करा फक्त ‘हे’ ४ घरगुती उपाय
Get rid of red ants : घरात आलेल्या मुंग्यांपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळवायची असेल, तर खालील घरगुती उपाय फॉलो करा.
Web Title: How to get rid of ants in the house quickly home remedies to get rid from ants get rid of ants fast cheap and easy tricks sjr