-
How To Find Sweet Watermelon: उन्हाळ्याच्या आधीच आता बाजारात हळूहळू कलिंगडाची एंट्री होऊ लागली आहे. आज आपण परफेक्ट कलिंगड निवडण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत.
-
अनेकदा आपण हौशीने कलिंगड घेऊन येतो खरं पण ते आतून अगदीच पांढरं आणि अगोड निघते. मग एकीकडे पैसे वाया गेल्याचा आणि दुसरीकडे एवढा जड कलिंगड उचलून आणल्याचा पश्चाताप होतो तो वेगळाच
-
आज आपणच न कापता, न चाखता कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे हे पाहणार आहोत.
-
कलिंगडाची शेंडी तपासायची. ती सुकलेली असली की समजायचं की फळ तयार आहे. म्हणजेच आतून लाल झालंय. आणि लाल झालं असेल तर ते गोड असणार
-
काही कलिंगडवर पांढरे डाग असतात,काहींवर पिवळे तर काहींवर केशरी – पिवळे.पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये.शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड खूप गोड असतो.
-
कलिंगडावर असलेली जाळी म्हणजे पोलीनेशन प्रक्रियेच्यावेळी माश्यांनी अधिक वेळा फुलांना स्पर्श केला आहे.जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड.
-
कलिंगडावर हाताने फटका मारा, जर पोकळ आवाज आला तर समजा कलिंगड पिकला आहे
-
तुम्ही कलिंगड लहान घ्या किंवा मोठा , तो वजनाने जड असायला हवा
-
कलिंगड हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. यामुळे शरीरातील पित्त कमी होऊन थंडावा मिळतो. आताच ही माहिती सेव्ह करून ठेवा म्हणजे येत्या उन्हाळ्यात तुमचे पैसे वाया जायला नकोत. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
कलिंगडावरील ‘या’ खुणा असतात गोड फळाचे संकेत; न कापता न चाखता एका सेकंदात निवडा कलिंगड, वाचवा पैसे
How To Buy Sweet Water Melon: आपण बाजारात फळे विकत घेता ना ‘गोड आहे ना?’ हा प्रश्न विचारतोच पण तुम्हीच सांगा ज्यांना ते फळ विकायचेच आहे ते नेहमीच खरं सांगतील का? त्यापेक्षा स्वतः हे संकेत ओळखायला शिका
Web Title: Spot these signs on watermelon to know if it is sweet without tasting or cutting find out sweet water melon jugad to save money svs