• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diy de tanning aloe vera and honey face mask at home tips and benefits dha

Summer skin care : उन्हाळ्यात टॅन घालवण्यासाठी कोरफडीचा फेसपॅक कसा बनवायचा पाहा…

त्वचेवरील काळपटपणा, टॅन घालवण्यासाठी कोरफड वापरून घरगुती डी-टॅनिंग फेसपॅक तयार करण्याच्या टिप्स आणि त्याचे फायदे पाहू.

Updated: February 25, 2024 21:20 IST
Follow Us

  • DIY aloe vera de tanning face pack at home
    1/7

    थंड वातावरणात हळूहळू बदल होऊन, उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांचा आपल्या त्वचेवर प्रचंड परिणाम होत असतो. रस्त्यावरील धूळ-मातीनेसुद्धा आपला चेहरा काळवंडतो, टॅन होतो.
    [Photo credit – Freepik]

  • 2/7

    असे असताना आपला चेहरा उन्हाळ्यातदेखील ताजातवाना आणि उजळ ठेवण्यासाठी काय करावे असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. अशा वातावरणात केवळ सनस्क्रीन लावून चालत नाही. त्याबरोबर त्वेचेला तजेला देणाऱ्या, आराम देणाऱ्या फेसपॅकचा वापर केल्यास उपयोग होऊ शकतो.
    [Photo credit – Freepik]

  • 3/7

    यासाठी आपण कोरफाड, लिंबू, मध असे घटक वापरून घरच्याघरी तयार केलेल्या फेसपॅकचा वापर करू शकतो. हा फेसपॅक कसा बनवायचा, त्याचे फायदे काय हे पाहू.
    [Photo credit – Freepik]

  • 4/7

    फायदे – कोरफडीमध्ये विविध जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेट्री, खनिजे, औषधी गुणधर्म असे घटक असतात. या सर्व घटकांमुळे त्वचा उजळते. त्वचेला थंडावा मिळण्यास मदत होते. त्वचा हायड्रेट होते. लिंबामध्ये असणारे घटक चेहऱ्यावरील काळे डाग, हायपर पिगमेंटेशन इत्यादी गोष्टींसाठी दूर करण्यास उपयुक्त असतात. त्वचेला मऊ आणि हायड्रेट करण्याचे काम मध करत असते. काकडी आणि दही हे दोन्ही घटक त्वचेला शांत आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
    [Photo credit – Freepik]

  • 5/7

    फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारी सामग्री – कोरफडीचा ताजा गर, लिंबाचा रस, मध. [तुम्हाला हवे असल्यास] दही किंवा काकडीचा रस [Photo credit – Freepik]

  • 6/7

    सर्वप्रथम कोरफडीचा गर एका बाऊलमध्ये काढून घ्या. यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून घ्या. तुम्हाला हवे असल्यास या मिश्रणात एक चमचा दही अथवा काकडीचा रस घालून सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने छान एकजीव करून घ्या.
    [Photo credit – Freepik]

  • 7/7

    प्रथम चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा अथवा क्लिन्झरच्या साहाय्यानेत्वचा स्वच्छ करून घ्या. तयार केलेला फेसपॅक बोटांच्या किंवा ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर एकसमान लावा. हा मास्क चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावून नंतर चेहरा धुवून टाका. मऊ टॉवेलच्या मदतीने चेहरा टिपून घ्या. सर्वात शेवटी तुमच्या आवडीचे मॉइश्चरायझर लावून घ्या.
    [Photo credit – Freepik]
    (हेही वाचा : दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड सिनेतारकांनी गाजवले रेड कार्पेट; पाहा हे फोटो)

TOPICS
ब्यूटी टिप्सBeauty Tipsसोपे घरगुती उपायEasy Home Remediesस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Diy de tanning aloe vera and honey face mask at home tips and benefits dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.