-
नोकरी, व्यवसाय यापेक्षा घर सांभाळणे सगळ्यात कठीण आणि जवाबदारीचे काम असते. प्रत्येकाला वेळेत डब्बा देणं, घरातील सर्व काम आवरणे, भांडी, कपडे धुणे, स्वयंपाक करणे आदी गोष्टी करता करता पूर्व दिवस कधी निघून जातो हे कळतंच नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
बऱ्याचदा घरातील कामे आवरताना स्वयंपाक घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष होते. तर आज स्वयंपाक घरात उपयोगी अश्या काही किचन हॅकबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याचा फायदा किचमध्ये काम करण्याची आवड असणाऱ्या सर्वांनाच होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. लिंबू : तुमचे कटिंग बोर्ड स्वछ ठेवण्यासाठी लिंबू वापरा: कटिंग बोर्ड धुतल्यानंतर, डाग आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी अर्ध्या लिंबूने घासून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
२. ऑलिव्ह ऑइल : एखादा पदार्थ बनवताना ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता ज्यामुळे पदार्थाना चव येईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
३. आलं : आलं फ्रीजरमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर त्याला किसून घ्या. जेणेकरून ते खराब होणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
४. आईस्क्रीम स्कूप (चमचा ) : फळे आणि भाज्यांमधून बिया काढण्यासाठी आइस्क्रीम स्कूप वापरा. आइस्क्रीम स्कूपच्या साहाय्याने अनेक फळांच्या बिया सहजपणे काढता येतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
५. मायक्रोवेव्ह : संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळांचा रस काढण्यापूर्वी १५ ते २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा ; त्यामुळे या फळांमधून अधिक रस काढण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
६. केळी प्लास्टिकचा वापर करून पॅक करा. त्यामुळे केळी जास्त काळ ताजी राहतील. केळीच्या देठाच्या वरच्या बाजूला प्लास्टिक लावल्याने केळी लवकर पिकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
७. सॅलड, हिरव्या भाज्या कंटेनरमध्ये पेपर टॉवेलसह ठेवा. जेणेकरून या भाज्यांचा अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यासाठी व अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून