• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is this ice apple do you know the benefits of this versatile fruit in india snk

हे Ice Apple काय असतं रे भाऊ? भारतातील ‘या’ बहुगुणी फळाचे फायदे माहित्येय का?

आईस अ‍ॅपल हे मुळात पामच्या झाडाचे फळ आहे, जे शीतलता देण्याचे काम करते आणि भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात एक सामान्य उन्हाळी फळ आहे.

March 28, 2024 21:11 IST
Follow Us
  • What is ice apple palm fruit tadgola rare indian fruit superfood benfits
    1/11

    आईस अ‍ॅपल म्हणजेच ताडगोळे. हे फळ चवीला गोड, स्वादिष्ट असून ते दिसायला मांसल आणि पारदर्शक असते. हे दुर्मिळ समुद्र किनारी फळ तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या प्रदेशात आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये आढळते. ते नारळासारख्या फळाच्या आत बंद असते ज्याचे बी बाहेर काढण्यासाठी बाहेरचे आवरण कापले जाते. (फोटो सौजन्य 1@manishbatavia / Mentos Zindagi/ एक्स)

  • 2/11

    याच फळाला आईस अ‍ॅपल किंवा ताडगोळा म्हणून ओळखले जाते जे मासांसारखे दिसते आणि पारदर्शक पिवळसर असते. हे फळ बर्फासारखे दिसते आणि चौकोनी आकाराचे असते. तुम्हाला माहितीये का या फळाला सुपरफूड मानले जाते पण का ? चला जाणून घेऊ या. (फोटो सौजन्य @Bengaluruhudugi/ एक्स)

  • 3/11

    आईस अ‍ॅपल म्हणजेच ताडगोळे
    हे चौकोनी बर्फासारखे फळ, आईस अ‍ॅपलला मराठी, हिंदीत ताडगोळा आणि तमिळमध्ये नुंगू असेही म्हणतात. आईस अ‍ॅपल हे मुळात पामच्या झाडाचे फळ आहे, जे शीतलता देण्याचे काम करते आणि भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात एक सामान्य उन्हाळी फळ आहे.  (vedicsaritanjali/ एक्स)

  • 4/11

    या वनस्पतीचे बाह्य कवच नारळासारखे दिसते, परंतु ते एक सुपरफ्रूट ठरते ते त्याच्या पोषक तत्वांनी भरलेली रचनेमुळे. ताडगोळा हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी साखरेने समृद्ध असे फळ आहे. हे फळ वजन कमी करण्यास मदत करू शकते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. (फोटो सौजन्य –exotic_or_desi /इंस्टाग्राम)

  • 5/11

    उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी ताडगोळ्यांचे सेवन करण्याचे शिफारस पुण्याचील सर्वाय आयुर्वेदच्या डॉ. स्नेहल जाधव यांनी केली आहे. ”नैर्सगिक पाण्याने समृद्ध असे ताडगोळे शरीराला थंडावा देतात आणि अनेक पोषक घटक पुरवितात.” (फोटो सौजन्य – cheftzac/ /इंस्टाग्राम))

  • 6/11

    आईस अ‍ॅपलचे हे सुपरफूड का आहे?
    बर्फासारखे दिसणारे हे फळ जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फायटोन्यूट्रिएंट्स आणि कार्बोहायड्रेट्सने भरलेले आहे. (फोटो सौजन्य – cheftzac/ /इंस्टाग्राम))

  • 7/11

    त्याशिवाय, या कमी-कॅलरी असलेल्या या फळामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे ए, सी, ई, आणि के, लोह, जस्त, फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असते, जे संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते (फोटो सौजन्य – toofoodee
    /इंस्टाग्राम)

  • 8/11

    हे फळ तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने चयापचय वाढण्यास मदत होते, जे पचन सुधारण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. शिवाय, आहारातील फायबर, प्रथिने आणि पाण्याचे प्रमाण एकत्र असल्याने प्रभावी वजन नियंत्रित करण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – chetanafoods, india.chronicles / /इंस्टाग्राम))

  • 9/11

    आईस अ‍ॅपल वजन कमी करण्यात कशी मदत करते?
    वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग हे फळ तुमच्या आहारात समाविष्ट करा. ताडगोळे नैसर्गिकरित्या पाण्याने भरलेले असतात, जे उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी उत्तम आहे.  (फोटो सौजन्य – @rishipi__/एक्स)

  • 10/11

     या फळातील फायबर घटक तृप्ति प्रदान करतात आणि शरीराला थंडपणा देते, जे पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. या फळामध्ये असलेले आहारातील फायबर लॅक्सेटिव्ह म्हणूनही काम करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. (फोटो सौजन्य –@1kunalbahl/एक्स)

  • 11/11

    अखेर, या फळाच्या कमी कॅलरी असलेली रचनेमुळे ते उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी एक परिपूर्ण फळ ठरते. (फोटो सौजन्य –@singhvarun एक्स )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: What is this ice apple do you know the benefits of this versatile fruit in india snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.