Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. chakravakasana uttanasana balasana yoga poses for better sleep before bedtime snk

रात्री झोप येत नसेल तर झोपण्याआधी करा फक्त हे तीन आसन, लागेल शांत झोप

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निद्रानाश दूर करण्यासाठी औषधापेक्षा ध्यान अधिक प्रभावी आहे. जाणून घेऊया चांगल्या झोपेसाठी कोणती आसने आवश्यक आहेत

Updated: April 2, 2024 16:10 IST
Follow Us
  • Chakravakasana uttanasana balasana yoga poses for better sleep before bedtime
    1/9

    Yoga For Sound Sleep: निद्रानाश हा असा आजार आहे ज्याचा त्रास अनेकांना होत असतो. हा आजार आपल्या आयुष्याचा एक भाग कधी बनतो हे आपल्याला कळत नाही. 

  • 2/9

    आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर कोणताही इलाज नाही. औषधे घेतल्याने ते कमी करता येते पण नाहीसे होत नाही.

  • 3/9

    हा झोपेचा विकार आहे ज्याचा लोकांना सतत त्रास होत आहे. इंग्रजीत त्याला स्लीप डिसऑर्डर (sleep disorder) म्हणतात.

  • 4/9

    निद्रानाश म्हणजेच स्लीप डिसऑर्डर (sleep disorder) अशी परिस्थिती ज्यामध्ये लोकांची झोप कमी होते आणि कधी कधी लोक रात्रभर जागे राहतात.

  • 5/9

    रोग्य तज्ज्ञांच्या मते, निद्रानाश दूर करण्यासाठी औषधापेक्षा ध्यान अधिक प्रभावी आहे.

  • 6/9

    चला तर मग जाणून घेऊया चांगल्या झोपेसाठी कोणती आसने आवश्यक आहेत.

  • 7/9

    चक्रवकासन | Chakravakasana | Cat- Cow Pose
    सर्व प्रथम, चटईवर गुडघे टेकून बसा.
    आता पुढे वाकून हात जमिनीवर ठेवा.
    अशा प्रकारे तुम्ही दोन गुडघे आमि दोन हातांवर जमिनीवर ठेवून प्राण्यांसारखे उभे राहा.
    दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.
    मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या.
    आता श्वास सोडताना पाठीचा कणावरच्या दिशेला ओढण्याचा प्रयत्न करा.
    नंतर श्वास घेताना खालच्या दिशने वाकवा. असे ३ ते ५ वेळा करा.
    यामुळे तुमच्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळेल. याशिवाय मणक्यातही लवचिकता येईल.

  • 8/9

    उत्तानासन | Uttanasana | Forward Fold
    सर्वप्रथम, चटईवर सरळ उभे रहा.
    पाय सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या आणि हात खाली करून कंबरेतून खाली वाका.
    या काळात तुमचे गुडघे वाकू नयेत हे लक्षात ठेवा.
    आता हाताने बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा
    आणि आपल्या गुडघ्याला नाकाने स्पर्श करा.
    हे आसन केल्याने मन शांत होते आणि निद्रानाशाच्या समस्येपासून आराम मिळतो.

  • 9/9

    बालासन | Balasana | Child’s Pose
    चटईवर गुडघे टेकून बसा.
    आता तुमच्या गुडघ्यावर बसा.
    दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुकावे.
    दोन्ही मांड्यांमध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.
    आणि आपल्या नाकाने चटईला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे आसन ४ वेळा करा.
    (टिप – लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)( सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Chakravakasana uttanasana balasana yoga poses for better sleep before bedtime snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.