-
Tips to Remove Egg Smell: बऱ्याच जणांना अंड्याचा वास अजिबात आवडत नाही त्यामुळे ते अंड खात नाही. कित्येकदा अंडी उकड्यानंतर भांड्याला देखील त्याचा वास येऊ लागतो जो कितीही साफ केला तरी पटकन जात नाही.
-
अशावेळी काय करावे समजत नाही. काळजी करु नका आमच्याकडे तुमच्यासाठी काही सोप्या उपाय आहेत जे भांड्याना येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी मदत करतू शकतात.
-
आपल्या स्वयंपाक घरात असे काही पदार्थ आहे जे तुम्हाला या कामासाठी मदत करतील.
-
व्हिनेगर ठरू शकते उपयोगी :
भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यामध्ये व्हिनेगर टाकून ठेवावे लागेल. -
मग साधारण अर्धा तासानंतर भांड्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. त्यामुळे अंड्याचा वास काही मिनिटांमध्ये गायब होईल.
-
बेकिंग सोडा वापरू शकता :
भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरू शकतो. त्यासाठी अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यात दोन चमचे सोडा आणि पाणी टाकून वीस मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. -
त्यासाठी भांड्याला पाण्याने साफ करा. त्यामुळे भांड्याला येणारा दुर्गंध दूर होईल आणि भांडे व्यवस्थित स्वच्छ होईल.
-
लिंबू आणि मीठाचा करा वापर :
लिंबाचा रस आणि मीठाचा वापर करुन भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करू शकता. लिंबामध्ये असलेले सायट्रीक अॅसिड तुमचे काम सोपे करु शकते. त्यामुळे यासाठी गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करुन भांड्यांला काही वेळ भिजत ठेवा. मग डिश वॉशने भांडे धुवूा. त्यामुळे भांडे अगदी स्वच्छ होऊन जाईल आणि अंड्याचा वास दूर होईल. -
चहा पावडर वापरा :
अंड्याचा वास दूर करण्यासाठी चहा पावडर वापरू शकत. त्यासाठी चहा केल्यांनतर गाळलेली चहा पावडर अंड्याच्या वास येणाऱ्या भांड्यामध्ये काही वेळासाठी राहू द्या. काही वेळाने ती चहा पावडर फेकून द्या आणि भांडे डिश वॉशने स्वच्छ करा. भांड्याला येणारा अंड्याचा वास गायब होईल. -
गरम पाण्याने भांडे साफ करा
भांड्याला स्वच्छ करण्यासाठी आणि दूर्गंध घालविण्यासाठी पाणी गरम करा. या पाण्यात सम प्रमाणात व्हिनेगर आणि लिंबू टाकून मिसळून घ्या. या पाण्याने भांडे साफ करा, भांड्यातून येणारा अंड्याचा वास गायब होईल. (टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे) ( सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)
भांड्याना अंड्याचा वास येतोय का? स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ वापरून पाहा, गायब होईल दुर्गंध
भांड्याना येणारा अंड्याचा वास दूर करतील स्वयंपाकघरातील हे ‘५’ पदार्थ, जाणून घ्या कसे वापरावे?
Web Title: These 5 kitchen items will remove the smell of eggs coming from the dishes know how to use them snk 94