• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality traits of people who born 1 10 19 and 28 of any month know their nature and personality ndj

Personality Traits : १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

जन्मतारखेवरून व्यक्तीचे चांगले वाईट गुण आपण सहज जाणून घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आपल्याला सहज ओळखता येते. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख ही १, १०, १९ आणि २८ आहे.

April 24, 2024 22:05 IST
Follow Us
  • Personality Traits
    1/9

    ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख खूप महत्त्वाची आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीचे चांगले वाईट गुण आपण सहज जाणून घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आपल्याला सहज ओळखता येते. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख ही १, १०, १९ आणि २८ आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्मलेल्या लोकांचा आकडा असतो एक. यांच्या दोन अंकी जन्मतारखेची बेरीज केली तरी १ आकडा समोर येतो. त्यांचा स्वत:वर खूप विश्वास असतो. त्यांच्यामध्ये खूप चांगली नेतृत्वक्षमता असते आणि ते खूप महत्त्वाकांक्षी असतात. आज आपण या लोकांविषयी जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 3/9

    कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेले लोक खूप प्रेरित, महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासक असतात. त्यांच्यामध्ये जन्मापासूनच नेतृत्व गुण असतो. ते खूप क्रिएटिव्ह असतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी जोखीम घेण्यास तत्पर असतात. त्यांच्यामध्ये असलेली साहसी वृत्ती यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते. (Photo : Freepik)

  • 4/9

    हे लोक व्यवसायाच्या ठिकाणी खूप चांगले यश मिळवू शकतात. व्यवसायात ते त्यांचे वेगळेपण दाखवू शकतात. ते नेतृत्वासह जबाबदाऱ्या सुद्धा स्वीकारतात. जेव्हा ते व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना यश येते. त्यांच्या कडे कोणतीही गोष्ट सुरू करण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द आणि दृढता असते. (Photo : Freepik)

  • 5/9

    याशिवाय ते कोणतीही समस्या सहज सोडवतात. व्यवसाय, व्यवस्थापन, राजकारण, स्वयंरोजगार इत्यादी गोष्टीमध्ये ते पारंगत असू शकतात. या क्षेत्रात ते यशस्वी होऊ शकतात. (Photo : Freepik)

  • 6/9

    या लोकांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करेन. त्यांना त्यांच्या आयुष्यात कायम प्रोत्साहन देईल. या लोकांना त्यांचे स्वातंत्र्य आवडते. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे दृढनिश्चयी आणि आत्मविश्वासू असलेल्या लोकांकडे ते सहज आकर्षित होतात आणि अशाच जोडीदाराच्या शोधात ते असतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    जरी हे लोक खूप उत्साही असले तरी त्यांच्यामध्ये इतरांवर वचर्स्व दाखवण्याचा गुण असतो. अनेकदा ते आत्मकेंद्री असतात ज्यामुळे ते स्वत:चाच विचार करतात.ज्यामुळे नातेसंबंधामध्ये वावरताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. (Photo : Freepik)

  • 8/9

    कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेले लोक खूप कर्तृत्ववान असतात. पण अनेकदा त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. खूप जास्त स्वातंत्र्य आवडत असल्यामुळे अनेकदा त्यांना इतरांकडून मदत घेणे किंवा मार्गदर्शन घेणे आव्हानात्मक वाटू शकते. (Photo : Freepik)

  • 9/9

    एखादी गोष्टी मिळवण्याच्या तळमळीमुळे अनेकदा त्यांची चिडचिड होऊ शकते. वैयक्तिक ध्येय मिळवण्याच्या नादात आपल्या सभोवतलाच्या इतर लोकांच्या गरजा सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

TOPICS
राशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyleव्यक्तिमत्वPersonality

Web Title: Personality traits of people who born 1 10 19 and 28 of any month know their nature and personality ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.