-
अनेकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. उंदीर हा विध्वंसक प्राणी आहे. (Photo : Pexels)
-
उंदरे अनेक ठिकाणी सामानाची नासधूस करताना दिसून येतात.उंदारांना पळवण्यासाठी आपण वाट्टेल त्या ट्रिक फॉलो करतो पण काहीही फायदा होत नाही. (Photo : Pexels)
-
तुमच्या घरात उंदरांमनी धुमाकूळ घातला आहे का? जर होत तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला उंदराना पळवण्याचा एक सोपा जुगाड सांगणार आहोत. (Photo : Pexels)
-
अनेक जण उंदीर मारण्याचे औषधी आणतात पण अनेकदा उंदीर मारणे, किळसवाणे वाटते अशावेळी उंदरांना न मारता घराबाहेर हाकलण्याची ही ट्रिक तुमच्या फायद्याची ठरू शकते. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
आपण हिरव्या मिरचीच्या मदतीने घरातून उंदीर पळवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चार हिरव्या मिरच्या घ्याव्या लागणार आहेत. या मिरच्या तिखट असाव्यात. (Photo : Pexels)
-
एका प्लेटमध्ये बेसन घ्या. या बेसनमध्ये व्हिनेगर टाका आण बेसन भिजवून घ्या. (Photo : Pexels)
-
जर तुमच्या घरी व्हिनेगर नसेल तर त्याऐवजी लिंबू घ्या. बेसनाची पेस्ट तयार होईल. त्यानंतर त्यात डिटर्जंट पावडर टाका. त्यानंतर तिखट हिरव्या मिरच्या बारीक करुन त्यात टाका. (Photo : Pexels)
-
त्यानंतर ही पेस्ट जुन्या वृत्तपत्रावर लावावी.त्यानंतर हे वृत्तपत्राचे पाच सहा लहान गोळे तयार करा आणि हे गोळे पेस्टमध्ये बुडवून काही ठराविक ठिकाणी जिथे उंदरांचा सर्वात जास्त वावर आहे तिथे ठेवावे. (Photo : Pexels)
-
हा अनोखा जुगाड घरातून उंदीर पळवण्यासाठी फायदेशीर ठरेल. (Photo : Pexels)
Jugaad : फक्त चार हिरव्या मिरच्या अन् पळवा घरातील उंदीर, जाणून घ्या भन्नाट उपाय
तुमच्या घरात उंदरांमनी धुमाकूळ घातला आहे का? जर होत तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला उंदराना पळवण्याचा एक सोपा जुगाड सांगणार आहोत.
Web Title: How to get rid of mouse at home with the help of four green chillies jugaad trick ndj