-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित होते. मुकेश अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानीसोबत शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. (ANI)
-
या सोहळयामध्ये अनंत अंबानी यांच्या हातावर एक महागडे घड्याळ दिसले, ज्याची किंमत १८ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अनंत अंबानींकडे अशा अनेक मौल्यवान गोष्टी आहेत. (ANI)
-
पीएम मोदींच्या शपथविधी सोहळ्यात अनंत अंबानी हे प्रिमियम घड्याळ बनवणारी कंपनी Patek Philippe घड्याळ घातलेले दिसले. त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Indian Express)
-
अनंत अंबानी यांचा दुबईजवळ जुमेराह येथे एक व्हिला आहे जो २०२२ मध्ये त्यांचे वडील मुकेश अंबानी यांनी भेट म्हणून दिला होता. समुद्र किनाऱ्यावरील ही मालमत्ता दुबईतील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक आहे. तो मुकेश अंबानींनी ६४० कोटी रुपयांना विकत घेतला होता. (Indian Express)
-
अनंत अंबानींच्या घड्याळ संग्रहात Patek Philippe Sky Moon Tourbillon घड्याळदेखील समाविष्ट आहे. हे जगातील सर्वात महागड्या घड्याळांपैकी एक आहे. (Indian Express)
-
अनंत अंबानी यांच्या मालकीची ‘बेंटले बेंटायगा’ ही भारतातील सर्वात महागडी आणि आलिशान SUV कार आहे. भारतात या कारची किंमत ४.१० ते ६ कोटी रुपयांपर्यंत आहे. (Indian Express)
-
याशिवाय अनंत अंबानींकडे ‘फ्लाइंग स्पर बेंटले’ देखील आहे जी आतापर्यंतची सर्वात आलिशान सेडान कार आहे. त्याची किंमत ३.६९ कोटी रुपये आहे. (Indian Express)
-
अनंत अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये ‘रोल्स रॉयस फँटम’ कारचाही समावेश आहे. त्याची किंमत १३.५० कोटी रुपये आहे. (Indian Express) हेही पहा- PHOTOS: नेहरु ते मोदी; स्वतंत्र भारताने ७५ वर्षात पाहिलेले १५ पंतप्रधान आणि त्यांची कारकीर्द
PHOTOS : फक्त महागडी घडीच नव्हे तर अनंत अंबानींकडे आहेत ‘या’ ५ अनमोल गोष्टी
PM Modi s oath ceremony Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला खूप महागडे घड्याळ घालून पोहोचले. या घड्याळाची किंमत करोडोंमध्ये आहे.
Web Title: Anant ambani arrived at pm modi s oath ceremony wearing a watch worth rs 20 crore also owns these 5 ridiculously expensive things spl