• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diy hotel booking rules hotel check in check out rules why do hotels check out time is 12 pm sjr

हॉटेलमध्ये चेक-इन केव्हाही केले तरी चेक-आऊट दुपारी १२ वाजताच का करावे लागते? वाचा हॉटेलचे नियम

hotel booking rules : हॉटेलच्या चेक-इन आणि चेक-आऊट टाइमवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. यातीलच काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

Updated: June 19, 2024 14:27 IST
Follow Us
  • diy hotel booking rules hotel check in check out rules Why do hotels check out time is 12 pm
    1/13

    पावसाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी अनेक जण निसर्गरम्य हवेशीर असे ठिकाण निवडतात. त्या ठिकाणी राहण्यासाठी म्हणूनही चांगल्या हॉटेलची निवड केली जाते.

  • बहुतेक लोक हॉटेल बुकिंग करताना तिथला परिसर, स्वच्छता, फूड अशा गोष्टी पाहून मगच बुकिंग करतात.
  • 2/13

    सहसा हॉटेलची रुम तुम्ही एका दिवसासाठी म्हणजेच २४ तास अशा हिशोबाने बुक करता. पण हॉटेलच्या नियमानुसार २४ तास अशा हिशोबाने बुकिंग होत नाही,

  • 3/13

    म्हणजे जर तुम्ही दुपारी २ किंवा ७ वाजता चेक-इन करत असाल, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत तुमची खोली रिकामी करावी लागते.

  • 4/13

    सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुम्ही २४ तासांचे भाडे भरता पण तुम्हाला पूर्ण २४ तास खोली मिळत नाही. पण हॉटेल्सवाले असे का करतात? जाणून घेऊ

  • 5/13

    हॉटेलमधून दुपारी १२ वाजता चेक-आउटची वेळ ही कोणत्याही एका शहर आणि राज्यापुरती मर्यादित नाही, तर देशभरातील बहुतेक हॉटेल्समध्ये चेक-आउटसाठी हीच वेळ निश्चित आहे. यामागचे कारण म्हणजे हॉटेलमध्ये एकामागून एक ग्राहक येतच असतात.

  • 6/13

    अशा वेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रूम स्वच्छ करण्यासाठी, बेडवरील चादर आणि इतर गोष्टी बदलून नीट करण्यासाठी आणि आवश्यक सुविधा तयार करण्यासाठी वेळ लागतो.

  • 7/13

    ग्राहकांच्या म्हणण्यानुसार चेक-आउटच्या वेळेत बदल केल्यास कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागेल आणि वेळेत सर्व रूम स्वच्छ करून नीट तयार करता येणार नाहीत.

  • 8/13

    ग्राहकांच्या सवयी लक्षात घेऊन दुपारी १२ वाजताची वेळ ठरवण्यात आली आहे. सामान्यत: लोक सुट्टीत उशिरापर्यंत झोपतात. त्यांना आरामात उठायला आणि तयार व्हायला दुपारचे १२ वाजतात. त्यामुळे चेकआऊटसाठी सकाळची वेळ ठेवली जात नाही. पण ठराविक वेळेमुळे हॉटेलमधील इतर ग्राहकांनाही थांबावे लागत नाही.

  • 9/13

    निश्चित चेकआउट आणि चेक-इनचा आणखी एक फायदा आहे. अशा प्रकारे हॉटेलच्या सर्व रूम अधिक चांगल्या पद्धतीने वापरल्या जातात. सर्व खोल्या एकाच वेळी ग्राहकांना दिल्या जाऊ शकतात.

  • 10/13

    कोणतीही रूम विनाकारण रिकामी राहणार नाही. निश्चित चेक-आउट टाइममुळे हॉटेल कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवासुविधांचे प्रभावीपणे नियोजन करण्यास आणि रूमचे वाटप करण्यास सोपे जाते.

  • 11/13

    चेक-आउट निश्चित वेळेमुळे हॉटेलच्या मॅनेजमेंट टीमला सर्व गोष्टींचे व्यवस्थापन सुरळीत करता येते, यामुळे नवीन ग्राहक सहजपणे चेक-इन करू शकतात.

  • 12/13

    नवीन ग्राहकांसाठी रूम वेळेवर तयार असल्याची खात्री पटते. ग्राहकांना लॉबीमध्ये ताटकळत उभे राहण्याची गरज लागत नाही. हे हाऊसकीपिंग आणि इतर हॉटेल सेवांसाठी सुसंगत टाइमटेबल तयार करण्यास मदत होते. (photo – freepik)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Diy hotel booking rules hotel check in check out rules why do hotels check out time is 12 pm sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.