• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. most expensive schools in india spl

PHOTOS : भारतातील सर्वात महागड्या ७ शाळा! वार्षिक फी जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल

भारतामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तसेच भारतातील अनेक शाळा त्यांच्या उच्च दर्जाच्या शिक्षण पद्धती आणि विविध सुविधांसाठी ओळखल्या जातात. आज आपण यापैकी काही अशा शाळांची माहिती घेऊयात जिथली वार्षिक फी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

July 2, 2024 17:04 IST
Follow Us
  • myomalumin
    1/9

    भारतात शिक्षणाला नेहमीच अधिक महत्त्व राहिले आहे. मुलांच्या मूलभूत गरजांमध्ये शिक्षणाचा समावेश होतो. प्रत्येक मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे आणि त्यांचे पालक देखील त्यांच्या मुलांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम शाळांमध्ये पाठवतात (फोटो स्त्रोत: mayoalumni.in)

  • 2/9

    भारतातील काही शाळा त्यांच्या उच्च स्तरावरील शिक्षण, सुविधा आणि पायाभूत सुविधांसाठी ओळखल्या जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप ७ सर्वात महागड्या शाळांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची वार्षिक फी जाणून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (फोटो स्त्रोत: doonschool.com)

  • 3/9

    The Doon School, Dehradun, Uttarakhand
    डेहराडून, उत्तराखंड येथे स्थित दून स्कूल ही १९३५ मध्ये स्थापन झालेली सर्व मुलांची खाजगी बोर्डिंग शाळा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची फी वार्षिक १० लाख २५ हजार रुपये आहे. टर्म फी २५ हजार रुपये आहे. (फोटो स्त्रोत: doonschool.com)

  • 4/9

    The Scindia School, Gwalior, Madhya Pradesh
    मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यात असलेली सिंधिया शाळा ही १८९७ मध्ये स्थापन झालेली मुलांची खाजगी बोर्डिंग शाळा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी १२ लाख रुपये आहे. (फोटो स्रोत: scindia.edu)

  • 5/9

    The Mayo College, Ajmer, Rajasthan
    राजस्थानमधील अजमेर येथे असलेले मेयो कॉलेज हेदेखील मुलांचे खाजगी बोर्डिंग स्कूल आहे, ज्याची स्थापना १८७५ मध्ये झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनआरआय विद्यार्थ्यांसाठी या शाळेची फी वार्षिक १३ लाख रुपये आहे. तर भारतीय विद्यार्थ्यांची वार्षिक फी ६ लाख ५० हजार रुपये आहे. (छायाचित्र स्रोत: mayoalumni.in)

  • 6/9

    Ecole Mondiale World School, Mumbai, Maharashtra
    जुहू, मुंबई येथे स्थित इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल ही एक मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील (IB) शाळा आहे. ही शाळा २००४ सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी ९ लाख ९० हजार रुपये आहे, तर वरिष्ठ विभागाची फी १० लाख ९० हजार रुपये आहे. (फोटो स्त्रोत: ecolomondiale.org)

  • 7/9

    Welham Boys School, Dehradun, Uttarakhand
    डेहराडून, उत्तराखंड येथे स्थित वेल्हॅम बॉईज स्कूल ही एक बोर्डिंग स्कूल आहे, ज्याची स्थापना १९३७ मध्ये झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी ५ लाख ७० हजार रुपये आहे. (फोटो स्त्रोत: welhamboys.org)

  • 8/9

    Woodstock School, Mussoorie, Uttarakhand
    वुडस्टॉक स्कूलची स्थापना उत्तराखंडमधील मसुरी शहराला लागून असलेल्या लांडूर या छोट्या हिल स्टेशनमध्ये १८५४ मध्ये करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची इयत्ता ६ वी ते १० वी ची वार्षिक फी १६ लाख रुपये आहे. तर इयत्ता १० ते १२ साठी १७ लाख ६५ हजार रुपये फी भरावी लागते. (छायाचित्र स्रोत: woodstockschool.in)

  • 9/9

    Good Shepherd International School, Ooty, Tamil Nadu
    गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल, तामिळनाडूच्या निलगिरीमधील ऊटाकामुंड म्हणजेच उटी येथे स्थित, ही एक लष्करी शाळा आहे, १९७७ मध्ये या शाळेची स्थापना झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी ६ ते १५ लाख रुपये आहे. (छायाचित्र स्रोत: gsis.ac.in) (हे पण वाचा: PHOTOS : परदेशातील शिक्षण, डिंपल यांच्याशी प्रेमविवाह ते मुख्यमंत्रीपद; अखिलेश यादव यांचा प्रवास कसा होता?)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Most expensive schools in india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.