-
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही विशेष गुण असतात तर काही कमतरता सुद्धा असतात. (Photo : Freepik)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, या सर्वांचा संबंध व्यक्तीच्या जन्माची वेळ आणि तारखेशी असतो. अंक शास्त्रानुसार, जन्म तिथि ही एक पासून नऊ पर्यंत अंक असते, यालाच मूलांक म्हणतात. (Photo : Freepik)
-
प्रत्येक व्यक्तीच्या जन्माचा मूलांक त्याच्या जन्मतिथिनुसार वेगवेगळा असतो. या मूलांकनुसार तुम्ही व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेऊ शकता. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले लोकांचा मूलांक ९ असतो. या मूलांकचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. (Photo : Freepik)
-
या लोकांचा कारक मंगळ ग्रह असतो त्यामुळे या मूलांकचे लोक मंगळ ग्रहापासून प्रभावित असतात. आज आपण या लोकांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
धनसंपत्ती
कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहते. या मूलांकच्या जास्तीत जास्त लोकांना वडिलोपार्जित धन संपत्ती प्राप्त होते. अनेकदा या कारणांमुळे या लोकांना वादविवादाचा सामना करावा लागतो. या लोकांची सतत धनसंपत्ती वाढत असते पण त्याच बरोबर या लोकांना भरपूर पैसा खर्च करायला आवडतो. (Photo : Freepik) -
स्वभाव
मंगळ ग्रहाचा प्रभाव मूलांक ९ असलेल्या लोकांवर दिसून येतो. हे लोक धाडसी, पराक्रमी, मेहनती आणि उत्साही असतात. या लोकांना हसून खेळून जगायला आवडते यामुळे त्यांच्या मित्रांमध्ये सुद्धा हे खूप लोकप्रिय असतात पण त्यांना राग सुद्धा खूप लवकर येतो. हे लोक शिस्त प्रिय असतात. या लोकांना कोणतीही समस्या आल्यानंतर मागे वळत नाही. ते समस्यांचा खंबीरपणे सामना करतात. (Photo : Freepik) -
प्रेमसंबंध
या तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये अडी-अडचणी येतात. या लोकांचे प्रेम संबंध स्थिर नसतात. अहंकारामुळे या लोकांच्या नात्यात दुरावा येतो. या लोकांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो. (Photo : Freepik) -
करिअर
मूलांक ९ असलेल्या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. या लोकांना लोक खेळ, पोलीस सेवा, इत्यादी क्षेत्रात आवड असते. यांना सुरूवातीपासून संघर्ष करावा लागतो पण दृढनिश्चय आणि इच्छा शक्तीच्या जोरावर ते आयुष्यात संधीचे सोने करू शकतात. (Photo : Freepik)
९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांना येतो लवकर राग; जाणून घ्या, कसा असतो यांचा स्वभाव?
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले लोकांचा मूलांक ९ असतो. या मूलांकचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. आज आपण या लोकांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
Web Title: 9 18 and 27 birthdate people are angry in nature know love relationship career money health wealth personality traits ndj