-
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. कधी कधी ही उत्पादने बरीच महाग असतात आणि इच्छित परिणाम देत नाहीत आणि त्वचेच्या समस्यांपासून आरामही देत नाहीत. यासाठी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरातच सोप्या पद्धतीने काही उपाय करू शकता.
-
जास्वंदाचे फुल नैसर्गिकरित्या त्वचेच्या समस्या सहजपणे दूर करू शकते. या फुलामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते, टॅनिंग दूर होते आणि त्वचाही चमकदार होते.
-
जास्वंदामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेला वृद्धत्वापासून वाचवतात. जाणून घ्या जास्वंद फुलाचे काही सोप्या आणि प्रभावी फेस पॅक.
-
जास्वंदाच्या फुलांची बारीक पेस्ट करून त्यामध्ये मध घालून चांगले मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेटेड आणि तेजस्वी होते.
-
जास्वंदा फुल आणि दहीचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
-
जास्वंदा फुलासोबत लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
-
जास्वंदा फुलासोबत हळदीचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.
Beauty Tips: ‘जास्वंदा’चे फुलाचे फेस पॅक देईल त्वचेच्या समस्यांपासून आराम; जाणून घ्या या सोप्या घरगुती पद्धती
‘जास्वंदा’च्या फुलापासून बनवलेले फेस पॅक तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. जाणून घ्या सोप्या पद्धती.
Web Title: Beauty tips hibiscus flower face pack will provide relief from skin problems learn these simple home remedies arg 02