Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. does eating bananas make babies sleep soundly sap

केळी खाल्ल्याने बाळाला शांत झोप लागते?

Babie Care: व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली केळी त्यांच्या मऊ आणि पचायला हलक्या अशा गुणधर्मांमुळे मुलांच्या रोजच्या आहारात समाविष्ट केली जातात.

August 27, 2024 21:55 IST
Follow Us
  • Does eating bananas make babies sleep soundly
    1/9

    डॉक्टर अनेकदा बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्यांच्या शारीरिक वाढ आणि विकासासाठी त्यांना केळी खाऊ घालण्याचा सल्ला देतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    पण, केळ्याच्या सेवनाने बाळाला खरंच चांगली झोप लागू शकते? (फोटो सौजन्य: Freepik)

  • एका झोपेशी संबंधित सल्लागाराने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, “केळ्यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे स्नायूंना आराम आणि मज्जातंतू शांत करण्यास मदत करते. त्यामुळे लहान बाळाला अधिक शांत झोप येते. ”, असे लिहिण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
    अनेक पालकांना बाळाला रात्री झोपवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सल्लागाराच्या पोस्टमागील सत्य पडताळून पाहिले. त्यासाठी आम्ही एका तज्ज्ञांचा सल्ला घेतला. (फोटो सौजन्य: Freepik)
  • 3/9

    तज्ज्ञांच्या सल्लानुसार,“व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली केळी त्यांच्या मऊ आणि पचायला हलक्या अशा गुणधर्मांमुळे मुलांच्या रोजच्या आहारात समाविष्ट केली जातात. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना आराम देतात; ज्यामुळे बाळाला चांगली झोप येऊ शकते.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • तज्ज्ञांच्या मते, “केळी सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊ शकतात; ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे झोप येण्यास मदत होते.” (फोटो सौजन्य: Freepik)
  • 4/9

    “रिसर्च गेट अभ्यासामध्ये लहान बाळांना केळी खाऊ घालण्यावर आणि त्यामुळे येणाऱ्या झोपेवर अभ्यास करण्यात आला आहे. परंतु, बाळाला केळी खाऊ घालणे आणि त्यानंतर येणारी झोप यावरील चांगल्या दर्जाचे संशोधन फार कमी आहे”,असे तज्ज्ञ म्हणाले.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    तज्ज्ञांच्या मते, “जर तुमच्या लहान बाळाला रात्री शांत झोप येत नसेल, तर काही घरगुती उपाय किंवा पर्यावरणीय बदल करून पाहा. ही समस्या सतत वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करा” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    तज्ज्ञांनी नमूद केले की, बाळाला रात्री शांत झोप न येण्यामागे विविध कारणे असू शकतात. “पण त्याच्या प्रभावी निदानासाठी त्यांची त्वरित तपासणी केली जाणे अत्यावश्यक आहे”, असे डॉ. सिदाराद्दी यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Does eating bananas make babies sleep soundly sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.