-
आपली त्वचा नेहमीच निरोगी आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो. पण अनेकदा हे सर्व प्रयत्न करूनही त्वचा निस्तेज दिसते. इतकेच नाही तर कमी वयातही त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.
-
यासाठी तुमच्या काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. जाणून घेऊया अशा काही सवयींबद्दल
-
धुम्रपान केल्याने त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. याशिवाय धूम्रपान केल्याने त्वचेची लवचिकता कमी होते, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. धुम्रपान त्वचेला डीहायड्रेट करते करून निर्जीव बनवते. यासाठी निरोगी त्वचेसाठी धूम्रपान करणे टाळले पाहिजे.
-
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीर डीहायड्रेट होते, ज्यामुळे त्वचा कोरडी होते. याव्यतिरिक्त तणाव देखील वाढतो. निरोगी त्वचेसाठी मद्यपान सेवन नियंत्रित केले पाहिजे.
-
असे मानले जाते की, सूर्यप्रकाश त्वचेसाठी फायदेशीर आहे. मात्र, उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते. यासाठी घराबाहेर पडताना किंवा उन्हात जाताना सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे.
-
शरीरात पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशनमुळे त्वचेला नुकसान होते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवले पाहिजे.
-
साखरेचे किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन केल्याने कमी वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात.
-
अति तणावामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. निरोगी त्वचेसाठी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही व्यायाम करू शकता, ध्यान करू शकता आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करू शकता.
-
(सर्व फोटो: अनस्पलॅश)
SkinCare: तुम्हालाही आहेत या सवयी? आजच करा बंद नाहीतर कमी वयातच चेहऱ्यावर दिसतील वृद्धत्वाची लक्षणे
कमी वयात वृद्धत्वाची लक्षणे दिसतात? मग आजच करा सवयींमध्ये बदल
Web Title: Do you have these habits stop it today otherwise the signs of aging will appear on your face at an early age arg 02