-
दरवर्षी श्रावण महिन्यात अमावस्याच्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात खास करुन विदर्भात हा सण खूप जल्लोषाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पुजा केली जाते. या दिवशी पुरण पोळी हा पदार्थ नैवद्य म्हणून बैलांना दाखवला जातो. (Photo : Social Media)
-
खरं तर पुरण पोळी खासकरुन सणासुदीला आवडीने बनवली जाते. पण अनेक लोकांना पुरण पोळी फुटेल का, याची भीती वाटते. टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स आणि विदर्भ स्टाइल पुरण पोळी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. (Photo : Social Media)
-
साहित्य :
चणा डाळ, तांदूळ पीठ, गव्हाचं पीठ, तेल, तूप, वेलची
जायफळाची पूड, मीठ (Photo : Social Media) -
चणा डाळ तीन तास भिजू घाला त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये चांगली शिजवा (Photo : Social Media)
-
शिजलेली डाळीत वेलची आणि जायफळाची पूड टाका आणि गरम गरम डाळ पुरणयंत्रात घालून चांगली वाटून घ्या. (Photo : Social Media)
-
मीठ घालून गव्हाचं पीठ पाण्याने भिजवावे. त्यावर तेल टाकून पीठ चांगले मळून घ्यावे (Photo : Social Media)
-
पीठाचा गोळा करुन छान पातळ पोळी लाटावी. पोळीचा वाटीसारखा आकार करुन त्यात पुरणयंत्रात वाटलेली डाळीचा गोळा टाकावा आणि हाताने ही पुरण पोळी थापावी. (Photo : Social Media)
-
गरम तव्यावर तुप घालून ही पुरण पोळी भाजावी. सर्व्ह करताना पुरण पोळीवर गरम गरम तूप टाकावे (Photo : Social Media)
-
पुरण पोळी भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा. पुरण पोळी लगेच डब्यात भरु नका. कागदावर गार होऊ द्या.पुरण पोळी चांगली भाजा. अनेकदा व्यवस्थित न भाजल्यामुळे पुरण पोळी फुटते. (Photo : Social Media)
Puran Poli : पुरण पोळी फुटण्याची भीती वाटते? टेन्शन घेऊ नका, अशी बनवा पुरण पोळी
Puran Poli recipe : अनेक लोकांना पुरण पोळी फुटेल का, याची भीती वाटते. टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स आणि विदर्भ स्टाइल पुरण पोळी कशी बनवायची, हे सांगणार आहोत.
Web Title: Note tips for not to breaking puran poli how to make tasty puran poli vidarbh style ndj