-
दरवर्षी १३ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील अनेक देश वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा करतात. काही ठिकाणी चॉकलेट फेस्टिव्हलही आयोजित केले जाते.
-
चॉकलेटचा वापर जवळपास जगभरात केला जातो. भारतीय बाजारपेठेत चॉकलेटला मोठे स्थान आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जगात सर्वात जास्त चॉकलेटचे उत्पादन कोणत्या देशात होते?
-
कोकोची वनस्पती प्रथम कोठे सापडली?
चॉकलेटचा इतिहास सुमारे चार हजार वर्षांचा आहे जो प्राचीन मेसोअमेरिकेत आढळतो. आज ते मेक्सिको म्हणून ओळखले जाते जेथे कोकोची वनस्पती प्रथम आढळली. अमेरिकेतील सर्वात प्राचीन असलेल्या ओल्मेक सभ्यतेच्या लोकांनी कोको वनस्पतीचे चॉकलेटमध्ये रूपांतर करण्याचे काम केले. तथापि, चॉकलेटच्या इतिहासाबद्दल इतर अनेक मत-मतांतरे आहेत. -
एका झाडात किती कोको बीन्स असतात?
दरम्यान, चॉकलेट कोकोच्या झाडापासून मिळणाऱ्या फळापासून बनवले जाते. या वनस्पतीच्या प्रत्येक शेंगामध्ये सुमारे 40 कोको बिया असतात. झाडापासून तोडल्यानंतर, कोकोच्या बिया प्रथम वाळवल्या जातात आणि नंतर भाजल्या जातात. -
हा देश जगात सर्वाधिक उत्पादन करतो
कोकोचा शोध अमेरिकेत लागला असला तरी, आज जगातील सर्वाधिक कोको उत्पादन पश्चिम आफ्रिकेतील दोन छोट्या देशांतून होते. हे दोन देश म्हणजे कोटे डी’आयव्होर (Côte d’Ivoire) आणि घाना (Ghana). हे दोन देश जगातील सुमारे ७०% चॉकलेटचे उत्पादन करतात. -
दोन दशलक्षाहून अधिक कोको फार्म आहेत
कोट डी’आयव्होर आणि घानामध्ये दोन दशलक्षाहून अधिक छोटे छोटे कोको फार्म आहेत. येथील हवामान आणि सुपीक जमीन यामुळे येथे कोकोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. -
किती टन उत्पादन झाले?
सन २०२२ मध्ये, जगातील कोको उत्पादनापैकी एक तृतीयांश उत्पादन कोट डी’आयव्होरचे होते. यावर्षी देशात २.२ दशलक्ष टन कोकोचे उत्पादन झाले. -
दुसरा कोणता देश आहे
२०२२ मध्ये सर्वाधिक कोकोचे उत्पादन करणारा कोट डी’आयव्होर नंतर घाना हा देश दुसऱ्या क्रमांकावर होता. या देशाचे उत्पादन १.१ दशलक्ष टन होते. -
हे देश कोकोचे उत्पादनही करतात
या दोन देशांव्यतिरिक्त इंडोनेशिया, इक्वेडोर, कॅमेरून, नायजेरिया, ब्राझील आणि पेरू या देशांमध्ये कोकोचे उत्पादन जगात सर्वाधिक प्रमाणात केले जाते. -
कोणत्या देशातील लोक सर्वाधिक चॉकलेट खातात?
स्वित्झर्लंडमधील लोक जगात सर्वाधिक चॉकलेट खातात. भारताबद्दल बोलायचे झाले तर केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये चॉकलेटचे सर्वाधिक उत्पादन केले जाते. -
(Photos Source: Freepik)
International Chocolate Day : ‘हे’ दोन छोटे देश जगातील ७०% चॉकलेटचे उत्पादन करतात, भारतातही ‘या’ ठिकाणी…
Which country produces the most chocolate? : १३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस साजरा केला जातो. दरम्यान, जगातील सर्वात जास्त कोकोचे उत्पादन कोणता देश करतो? याबद्दल जाणून घेऊयात.
Web Title: These two small countries produce 70 percent of the world s chocolate cocoa beans spl