• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is herbal pan masala safe to quit tobacco gutkha addiction sap

तंबाखू, गुटख्याचे व्यसन सोडण्यासाठी हर्बल पान मसाला सुरक्षित आहे का? तज्ज्ञांचे मत काय..

Herbal pan masala: या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत प्रचलित आहे, ज्यामुळे मौखिक आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात.

September 21, 2024 11:00 IST
Follow Us
  • herbal pan masala safe to quit tobacco gutkha addiction
    1/9

    भारतातील अनेक लोक पान मसाला आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत प्रचलित आहे, ज्यामुळे मौखिक आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    या समस्यांमुळे बऱ्याचदा घातक रोगांचा धोका वाढतो. हे धोके, समस्या माहीत असूनही लोक या पदार्थांच्या व्यसनाधीन झाले आहेत, त्यामुळे हे व्यसन सोडवणे खूप कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (२०१६) च्या संशोधन अभ्यासानुसार, ल्युकोप्लाकिया, सबम्यूकस फायब्रोसिस, एरिथ्रोप्लाकिया आणि लाइकेन प्लॅनस यांसारख्या मौखिक कर्करोगाच्या स्थितीचे प्रमाण तंबाखूचे सेवन न करणाऱ्यांमध्ये ३.१७ टक्के आणि तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये १२.२२ टक्के होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    डॉ. रवी कुमार झा, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, फरिदाबाद येथील पल्मोनोलॉजिस्ट म्हणाले की, “पान मसाल्यातील निकोटीन आणि इतर सायकोएक्टिव्ह पदार्थ मज्जासंस्थेला उत्तेजित करतात, ज्यामुळे काही क्षण शरीरात सतर्कता आणि उत्साही असल्यासारखे वाटते. ज्यामुळे नंतर व्यसन, चिडचिडेपणा आणि चिंता यांसारखी लक्षणे दिसून येतात. ते पुढे म्हणाले की, “पान मसाल्याचा दीर्घकाळ वापर केल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे शरीराला संक्रमण आणि गंभीर रोग होण्याची शक्यता वाढते.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    पारंपरिक पान मसाल्यामध्ये कात, सुपारी, चुना, बडीशेप, वेलची, गोड पदार्थ, पुदिन्याची पाने, मेन्थॉल आणि तंबाखूसह किंवा त्याशिवाय विविध चव वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. “तंबाखूसह खजूर, गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद यांसारख्या गोड पदार्थांचा वापर केला जातो. यात पचनासंबंधित गुण तसेच एक उत्तम गंध असतो. परंतु, हे नियमित सेवन करू नये; विशेषतः तंबाखूसह याचे सेवन योग्य मानले जात नाही.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    हर्बल पान मसाल्यांमध्ये काँच बीजा (मुकुना प्रुरिएन्स बियाणे), चिंच, आवळा, हळद, वेलची, केशर, अश्वगंधा, ग्लायसिरिझा ग्लेब्रा, मेन्थॉल आणि इतर फायदेशीर औषधी वनस्पती असतात. “हे तंबाखूपासून मुक्त आणि याचे व्यसन लागत नाही,” असे सुमित यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    आयुर्वेदिक अभ्यासक डॉ. दीक्षा भावसार सावलिया यांनी सांगितले की, “हे मिश्रण तुम्हाला ताजेतवाने ठेवतात, यामुळे दुर्गंधी टाळता येते आणि हे पचनास मदत करतात, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांसाठी संभाव्य बदल म्हणून हे योग्य काम करते आणि त्यांना व्यसन सोडण्यापासून दूर करण्यास मदत करते.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    आरोग्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही तंबाखू, गुटखा खाणं पूर्णपणे सोडणे. त्यासाठी जर तुम्हाला सतत तंबाखू, गुटखा चघळण्याची सवय असेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया किंवा अगदी भाजलेले चणेदेखील खाऊ शकता किंवा विविध फ्लेवर्समध्ये साखर विरहित च्युइंगम तुम्हाला फ्रेश ठेवतील. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Is herbal pan masala safe to quit tobacco gutkha addiction sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.