Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you oversleep on weekends then read what health experts ndj

Oversleeping : वीकेंडला तुम्ही जास्त झोपता का? मग हे वाचाच

वीकेंडला जास्त झोपल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

September 27, 2024 20:59 IST
Follow Us
  • Oversleeping :
    1/9

    झोप ही आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरीसुद्धा अनेकजण पुरेशी झोप घेत नाही, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर दिसून येतो. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी काही लोक वीकेंड आला की भरपूर झोपतात; पण तुम्हाला माहिती आहे का वीकेंडला अति झोप घेणे कितपत योग्य आहे? आणि वीकेंडला जास्त झोपल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Photo : Freepik)

  • 2/9

    एका नवीन अभ्यासात असे समोर आले की, झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी वीकेंडला अति झोपण्याचा फक्त झोपेच्या वेळेवर नाही, तर व्यक्तीच्या आतड्यांवरही परिणाम दिसून येतो. द युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ‘King’s and ZOE’ या कंपनीच्या काही संशोधकांना असे दिसून आले की, वीकेंडला अति झोपल्यामुळे जेव्हा झोपेची वेळ आणि नियमित कामाची वेळ एक होती; तेव्हा लोकांच्या आहाराच्या सवयी आणि गुणवत्तेवर याचा दुष्परिणाम दिसून आला. (Photo : Freepik)

  • 3/9

    याशिवाय ॲसिडीटी आणि आतड्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम दिसला.
    लठ्ठपणा आणि मधुमेह असणाऱ्या लोकांवर आणखी एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असे समोर आले की, जे लोक रात्री सात तासांपेक्षा जास्त झोपतात ते जास्त निरोगी आहेत. (Photo : Freepik)

  • 4/9

    अभ्यासात असेही सांगितले की, तुमच्या आतड्यांमध्ये असणारे मायक्रोबायोम म्हणजे सूक्ष्मजीव विष आणि चयापचय तयार करून चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम करू शकतात. पुढे अभ्यासात असेही सांगितले की, जेट लॅग या झोपेच्या आजाराचा थेट संबंध गोड पदार्थांचे जास्त सेवन, फळ आणि नट्सचे कमी सेवन यांच्याशी आहे; ज्यामुळे आतड्यांमध्ये असणारे मायक्रोबायोम नकारात्मक परिणाम दाखवू शकतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    किंग्स कॉलेज लंडन आणि ZOE च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सारा बेरी सांगतात, “नियमित झोपेची वेळ पाळणे गरजेचे आहे. केव्हा झोपायचे आणि केव्हा उठायचे, हे जर ठरविले तर आपण आपली जीवनशैली अधिक सुधारू शकतो; ज्यामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजीवांवरसुद्धा याचा चांगला परिणाम दिसून येईल. (Photo : Freepik)

  • 6/9

    तज्ज्ञ सांगतात, “आठवड्याचे सोमवार ते शुक्रवार हे दिवस आणि शनिवार व रविवार हे दोन दिवस, या दरम्यान झोपेच्या वेळापत्रकात फरक दिसून आला तर शरीराच्या सर्कॅडियनवर (circadian rhythm) परिणाम दिसून येऊ शकतो. यालाच आपण सोशल जेटलॅग ‘social jetlag’ म्हणतो.
    “सोशल जेटची लक्षणे – जसे की थकवा जाणवणे, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यास अडचण इत्यादी असू शकतात. ज्याचा थेट परिणाम आपल्या मुडवर होऊ शकतो”, असे न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल यांनी सांगितले. (Photo : Freepik)

  • 7/9

    अहमदाबादच्या एचसीजी हॉस्पिटलच्या सल्लागार डॉ. श्वेतल गाढवी सांगतात, “चांगल्या आरोग्यासाठी झोपेचे वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे.”
    “वीकेंडला जास्त झोप घेण्याचा मोह होऊ शकतो, पण झोपेवर समतोल राखा. झोपेच्या वेळापत्रकात अनियमितता तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. यामुळे सतत मूड बदलणे, थकवा जाणवणे किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. संतुलित झोप घेणे हे चांगल्या आरोग्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन आहे”, असेही डॉ. गाढवी म्हणतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    १. झोपेचे वेळापत्रक तयार करा. झोपण्यापूर्वी, वाचन, योग, ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. २. जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर मर्यादित करा. अल्कोहोलमुळे झोपेच्या वेळापत्रकामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे झोपेच्या वेळी मद्यपान टाळा. (Photo : Freepik)

  • 9/9

    ३. वीकेंडला अति झोपणे टाळा. गरजेपेक्षा जास्त झोप आरोग्यावर परिणाम करू शकते. ४. चांगला आहार घ्या. फळे, भाज्या, धान्य, प्रोटीनयुक्त संतुलित आहार घ्या. पौष्टिक आहार नेहमी झोपेसाठी फायदेशीर ठरू शकतो. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Do you oversleep on weekends then read what health experts ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.