-
भारतात दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
यावेळी महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अहिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपती महात्मा गांधी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत असत. स्वदेशी गोष्टींचा त्यांच्या जेवणात समावेश असायचा. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मोड आलेली धान्य
महात्मा गांधी नाश्त्यात भरपूर अंकुरलेले धान्य खात असत. याचे सेवन केल्याने वजन कमी होणे, पचन, कर्करोग आणि मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. (फोटो: फ्रीपिक) -
फळे
राष्ट्रपिता महात्मा गांधी आयुष्यभर शुद्ध शाकाहारी राहिले. फळांमध्ये त्यांना द्राक्षे आणि हंगामी फळे खूप आवडायची. (फोटो: पेक्सेल्स) -
हे ड्रायफ्रुट्स भरपूर खात
सुक्या मेव्यांबद्दल सांगायचे तर, महात्मा गांधीही नाश्त्यात भरपूर खजूर आणि सुका मेवा खात. सुक्या मेव्याचे सेवन हृदयापासून ते मधुमेहापर्यंत सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. (फोटो: पेक्सेल्स) -
या पिठापासून बनवलेली भाकरी खायचे
बापूंच्या नाश्त्यात बकरीचे दूध, गव्हाची भाकरी आणि मध यांचाही समावेश होता. याशिवाय घरच्या गिरणीत बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी ते खात असत. ब्रेडला विकल्प म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला. (फोटो: पेक्सेल्स) -
पूर्वीचा आहार असा होता
एकेकाळी महात्मा गांधींनी दूध आणि धान्य सोडून फक्त फळे आणि सुक्या मेव्यावर अवलंबून राहायला सुरुवात केली होती. बकरीचे दूध पिण्यापूर्वी ते द्राक्षे आणि बदाम खात असत. (फोटो: पेक्सेल्स) -
शेळीच्या दुधाचा पर्याय
एकदा महात्मा गांधी खूप आजारी पडले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दूध पिण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी गाय आणि म्हशीऐवजी शेळीच्या दुधाचा पर्याय निवडला होता. (फोटो: फ्रीपिक)
महात्मा गांधींचा आहार कसा होता? बापू ‘या’ स्वदेशी गोष्टी आवडीने खायचे!
Happy Gandhi Jayanti, Mahatma Gandhi Diet: आजघडीला आपण महात्मा गांधींचा आहार पाळल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. बापूंनी कोणता आहार पाळला ते जाणून घेऊया.
Web Title: What kind of diet did mahatma gandhi follow know its health benefits spl