-
फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी यांच्या मते, वजन १.५ ग्रॅम जरी वाढल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अभिनेता छवी हुसेनशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, “१.५ ग्रॅम वजन वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मात्र, पोटाची चरबी वितळली तर मधुमेहाचा धोकाही कमी होतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संचालक आणि युनिट हेड इंटरनल मेडिसिन डॉ. सतीश कौल यांनी डॉ. त्रिपाठी यांच्या मताशी सहमती दर्शवली आणि सांगितले की, १.५ ग्रॅम इतके वजन वाढल्यानेही हळूहळू टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“हे विशेषतः जेव्हा अतिरिक्त वजनामध्ये चरबी जमा झाल्याने किंवा कमी चरबी जमा होण्यानेही इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि ग्लुकोजचे नियमन बिघडू शकते,” असे डॉ. सतीश कौल म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
विशेषतः तळलेले, प्रक्रिया केलेले आणि आरोग्यासाठी हानिकारक अन्न; ज्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक, जास्त साखर आणि चिप्स, ब्रेड, कँडी आणि सोडा यांसारख्या पदार्थांचे जास्त सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तज्ज्ञ सांगतात की, “या किरकोळ वाढीमुळे” दीर्घकाळ जळजळ होऊ शकते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. विशेषत: या समस्या आधीपासून अनुवंशिक किंवा जीवनशैलीच्या कारणांमुळे धोका असलेल्या व्यक्तींमध्ये दिसतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“सूक्ष्म पातळीवरही वजन नियंत्रित ठेवणे ही चयापचयाशी संबंधित विकार टाळण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते,” असं डॉ. कौल म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
म्हणूनच नियमित केलेली शारीरिक हालचाल मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण ते कॅलरी बर्न करण्यास, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ज्यांना आधीपासून मधुमेहाचा धोका आहे, त्यांच्या अगदी कमी प्रमाणात वजन कमी केल्यानेदेखील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारू शकते आणि धोका वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. “मधुमेहाची सुरुवात रोखण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे”, असे. डॉ. श्रीनिवास चारी ए, सल्लागार, जनरल मेडिसिन, ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटल, एलबी नगर, हैदराबाद यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार घेतल्याने संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. “रोज ३०-४५ मिनिटे व्यायाम करून, निरोगी वजन नियंत्रित करून, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करून आणि नियमित आरोग्य तपासणीचे वेळापत्रक ठरवून त्यांचा धोका टाळता येतो,” असे डॉ. कौल म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
१.५ ग्रॅम वजन वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Weight Gain Increase Diabetes Risk: नियमित केलेली शारीरिक हालचाल मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण ते कॅलरी बर्न करण्यास, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
Web Title: Can a 1 5 gram weight gain increase the risk of diabetes get expert advice sap