• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. replace your morning coffee with lemon and clove water how to prepare it read expert advice asp

लिंबू, लवंगयुक्त पाणी प्यायल्याने सर्दी, घसा खवखवणे होईल कमी; कसं बनवायचं हे पेय? जाणून घ्या

lemon and clove water to fight winter cold: लिंबू त्याच्यामधील क जीवनसत्त्वासाठी ओळखला जातो, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे श्वसनमार्गातील श्लेष्मा सैल करून, तो बाहेर काढण्यास मदत करतो…

November 25, 2024 20:51 IST
Follow Us
  • Waking up with a stuffy nose and scratchy throat is unpleasant
    1/9

    जसजसे हिवाळ्याचे महिने सुरू होतात, तसतसे सर्दी, घसा खवखवणे सुरू होते. झोपेतून उठल्यावर नाक बंद आणि घशात खरखरीत वाटणे अशा अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. पण, असे जाणवल्यास संपूर्ण दिवस खूप थकल्यासारखे होते. मग अशा वेळी सकाळी दिवसाची सुरुवात कॉफीने करण्याऐवजी एक कप लिंबू अन् लवंगाचे कोमट पाणी पिऊन बघा. खोकला आणि सर्दीसाठी हा एक घरगुती उपाय आहे; ज्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/9

    हे साधे पेय सर्दीच्या लक्षणांपासून मुक्त करण्याप्रमाणेच वजन व्यवस्थापनासही साह्यभूत ठरू शकते का याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने एमजीएम (MGM) हेल्थकेअरच्या प्रमुख आहार तज्ज्ञ व आरोग्य तज्ज्ञ विजयश्री एन. यांच्याशी चर्चा केली. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/9

    पण लिंबू आणि लवंगच का? कारण – लिंबू त्याच्यामधील क जीवनसत्त्वासाठी ओळखला जातो, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे श्वसनमार्गातील श्लेष्मा सैल करून, तो बाहेर काढण्यास मदत करतो. तर दुसरीकडे, लवंगात दाहकविरोधी गुणधर्म असतो. त्यात युजेनॉल, गॅलिक ॲसिड यांसारखी संयुगे असतात, जी अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि पेशींचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात, असे विजयश्री म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 4/9

    विजयश्री यांनी असेही सांगितले की, लवंगेमुळे खोकला कमी होऊन, श्वासोच्छ्वास घेण्यास मदत होते. तसेच श्वसनमार्ग साफ करण्यासही त्याचा लाभ होतो. त्यामुळे शांत झोपेला प्रोत्साहन मिळते. एकंदरीत सर्दी आणि खोकल्यामध्ये लवंग फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/9

    सकाळी कॉफीऐवजी लिंबू, लवंगयुक्त पाणी प्या :तुम्ही सकाळी कॉफीची जागा लिंबू व लवंगयुक्त पाण्याने घेतल्यास तुम्हाला कॅफिन मिळणार नाही; पण त्या पाण्याचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत.दूध व साखर असलेल्या एका सामान्य कॉफीमध्ये सुमारे १०० ते २०० कॅलरीज असतात; तर लिंबू व लवंगाच्या पाण्यात एक चमचा मध घातल्यास, त्या पेयात केवळ सुमारे २० कॅलरीज मिळू शकतात, असे विजयश्री म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/9

    कॅलरीजचे सेवन कमी करणे हे तुमचे ध्येय असल्यास हे पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याशिवाय लिंबू व लवंगाचे खूप फायदे आहेत. विशेषत: जेव्हा तुम्हाला सर्दीची लक्षणे जाणवत असतील किंवा घसा खवखवत असेल तर आणि थंडीची लक्षणे जाणवत असताना दिवसातून दोनदा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी लिंबू व लवंगाचे पाणी पिण्याची शिफारस केली आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    लिंबू व लवंगयुक्त पेय कसे बनवायचे ? १. लवंग उकळवा : पाण्यात लवंग उकळून घ्या. २. लिंबाचा रस आणि मध घालण्यापूर्वी तुम्ही उकळवलेले पाणी थंड होऊ द्या. क जीवनसत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि कडूपणा टाळण्यासाठी पाणी गरम असताना लिंबू घालणे टाळा.३. मध वापरा : आरामदायक प्रभाव आणि संतुलित चवीसाठी एक चमचा मध घाला. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/9

    जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल, तर साधारण सात ते १० दिवस दररोज हे पेय प्यावे, असे विजयश्री यांनी सुचवले आहे. हे पेय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता. तसेच तुमच्या नेहमीच्या कॉफी किंवा चहाला हा एक खास पर्याय म्हणूनदेखील काम करील. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/9

    हे पेय कोणी पिऊ नये? हे पेय सगळ्यांसाठी सुरक्षित असले तरी, पेप्टिक अल्सर, अन्ननलिका समस्या किंवा घशाची संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींनी हा उपाय काळजीपूर्वक वापरावा. मध घातल्याने लिंबाच्या आंबटपणाचा समान करण्यास मदत होते. त्यामुळे लक्षात ठेवा की, लिंबू व लवंगाचे पाणी थंडीच्या सौम्य लक्षणांपासून आराम देऊ शकत असले तरीही अधिक गंभीर संक्रमणांसाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले ठरेल. (फोटो सौजन्य : @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Replace your morning coffee with lemon and clove water how to prepare it read expert advice asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.