Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know benefits of having early dinner read tips for healthy lifestyle ndj

रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे माहितीये का? जाणून घ्या…

तुम्हाला रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे माहितीयेत का? दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

November 30, 2024 16:49 IST
Follow Us
  • benefits of having early dinner
    1/9

    तुम्हाला रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे माहितीयेत का? दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटल येथील मिनिमल अॅक्सेस, जीआय व बॅरिअॅट्रिक सर्जरीचे संचालक डॉ. सुखविंदर सिंग सग्गू सांगतात, “रात्री शारीरिक क्रिया मंदावतात.
    त्यामुळे रात्री उशिरा जेवण करण्यापेक्षा सूर्योदय आणि सूर्यास्त यादरम्यान जेवण करावे. कारण- यादरम्यान अन्नाचे चांगल्या रीतीने पचान होते. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते. (Photo : Freepik)

  • 3/9

    डॉ. सग्गू पुढे सांगतात, “दिवसातून तुमचे पहिले अन्न उठल्यानंतर सुमारे दीड तासाने आणि तुमचे शेवटचे अन्न झोपण्यापूर्वी २-३ तास आधी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये थोडा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. एकंदरीत अशा प्रकारे आहार घ्यावा.” (Photo : Freepik)

  • 4/9

    तज्ञांच्या मते, अशा तऱ्हेने आहार घेतल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजेच उच्च एचडीएल (चांगले) आणि हानिकारक एलडीएल यांच्यावर नियंत्रण राहते. (Photo : Freepik)

  • 5/9

    त्याशिवाय जेवण लवकर केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि आजारांचा धोका कमी होतो, अशी माहिती डॉ. सग्गू पुढे सांगतात. (Photo : Freepik)

  • 6/9

    आहारात हलके व पौष्टिक पदार्थ घ्या; ज्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. या पदार्थांचे अतिसेवनसुद्धा करू नये. (Photo : Freepik)

  • 7/9

    प्रत्येक गोष्टीचे योग्य ते प्रमाण ठरवून, त्यानुसार सेवन करा. तुम्हाला किती भूक लागली आहे, याचा नेहमी विचार करा आणि त्यानुसार स्नॅक्स खा; जेणेकरून तुमचे पोट भरेल. (Photo : Freepik)

  • 8/9

    भरपूर पाणी प्या. कारण- कधी कधी डिहायड्रेशनमुळेही भूक लागली आहे, असे वाटू शकते. (Photo : Freepik)

  • 9/9

    शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची आवश्यकता आहे, याकडे लक्ष द्या. तुम्ही चांगले पौष्टिक स्नॅक्स निवडून, दिवसभर निरोगी आहार घेऊ शकता. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Do you know benefits of having early dinner read tips for healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.