-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल. पंचांगानुसार, शनी २०२५ पर्यंत आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीतच विराजमान राहील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच सूर्य १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि १४ मार्चपर्यंत याच राशीत विराजमान राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीत सूर्य-शनी एकत्र आल्याने त्यांची युती निर्माण होईल. जी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य-शनीची युती वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनी-सूर्याची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-सूर्याची युती वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा बदल सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
नव्या वर्षात सूर्य-शनीची युती करणार कमाल; ‘या’ तीन राशी होणार मालामाल
Surya gochar 2025: सूर्य १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि १४ मार्चपर्यंत याच राशीत विराजमान राहील.
Web Title: Sun saturn yuti im 25 these three zodic sign will get success sap