-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या मंगळ कर्क राशीमध्ये वक्री झाला असून तो फेब्रुवारी २०२५ मध्ये तो सरळ मार्गस्थ होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या दुसऱ्या घरात मंगळ असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मार्गस्थ मंगळ खूप लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असेल. या काळात अनेक धार्मिक यात्रा कराल. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मार्गस्थ मंगळाचा कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२०२५ मध्ये मंगळ देणार भाग्याची साथ; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Mangal Rashi Parivartan 2025: सध्या मंगळ कर्क राशीमध्ये वक्री झाला असून तो फेब्रुवारी २०२५ मध्ये तो सरळ मार्गस्थ होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.
Web Title: Mars will give luck in 25 people of these three signs will get success in every work sap