-
जर तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर झोप येत असेल आणि दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात अनेक खनिजांची कमतरता असू शकते. खरंतर हे अशक्तपणाचे लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु ही समस्या अनेक दिवसांपासून अशीच राहिल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधाबरोबर एनर्जी पावडर घेतल्याने या सर्व समस्यांपासून आणि अशक्तपणापासून सहज दूर राहू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बाजारात अनेक एनर्जी बूस्टर उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही तुमच्या घरी सहज एनर्जी बूस्टर पावडर बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधाबरोबरही ती घेऊ शकता. ही पावडर बनवण्यासाठी मखाणे, काजू, बदाम, हरभरा आणि गूळ यांचा वापर केला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
वास्तविक, सुक्या मेव्यापासून बनवलेल्या या एनर्जी बूस्टर पावडरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देण्यासोबतच शरीराला ऊर्जा देते आणि शरीराचे आरोग्य सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यासाठी २५० ग्रॅम मखाना, १५० ग्रॅम काजू,बदाम, २०० ग्रॅम भाजलेले हरभरे, ५० ग्रॅम तीळ आणि गूळ घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
एनर्जी बूस्टर पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाणे घ्या आणि ते तूपात हलके भाजून घ्या. त्यानंतर काजू आणि बदामही हलके भाजून घ्या. काही वेळाने तीळ मंद आचेवर भाजून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये टाका. त्यानंतर आता त्यात भाजलेले हरभरे घालून तुमच्या चवीनुसार त्यात गूळ घाला. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी एनर्जी बूस्टर पावडर सहज बनवू शकतो. ही एनर्जी बूस्टर पावडर दुधात मिक्स करून दररोज घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
अशक्तपणा दूर करण्यासाठी घरच्या घरी बनवा एनर्जी बूस्टर पावडर
Energy Booster Powder: सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधाबरोबर एनर्जी पावडर घेतल्याने या सर्व समस्यांपासून आणि अशक्तपणापासून सहज दूर राहू शकता.
Web Title: Make energy booster powder at home to get rid of weakness sap