• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. can a pillow stop your snoring find out what the experts say sap

एका उशीमुळे तुमचे घोरणे बंद होऊ शकते? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या…

Wedge Pillow: ही खास डिझाइन केलेली उशी आहे, तजी तुम्ही झोपत असताना तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला आधार देण्यास मदत करते.

January 7, 2025 12:49 IST
Follow Us
  • which is the best pillow for sleep
    1/10

    सतत घोरणे त्रासदायक ठरू शकते, परंतु ते आरोग्य समस्यादेखील सूचित करू शकते. घोरणे टाळण्यासाठी मूळ कारण शोधून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/10

    तज्ज्ञ वेज (wedge) उशीपासून सुरुवात करण्याचा आग्रह करतात, ज्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळू शकेल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/10

    हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे एचओडी, इंटरनल मेडिसिन आणि वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. हरिचरण यांनी सांगितले की, विशेषतः वैद्यकीय दृष्टिकोनातून वेज उशी घोरणे रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/10

    “झोपल्यावर तुम्ही तेव्हाच घोरता, जेव्हा घशाचे स्नायू शिथिल होतात आणि जिभेची स्थिती किंवा झोपेच्या वेळी नाक बंद झाल्यामुळे श्वासनलिकेला अर्धवट अडथळा येतो, तेव्हा घोरणे अनेकदा उद्भवते. वेज कुशन शरीराच्या वरच्या भागाला उंच करते, ज्यामुळे हवेचा प्रवाह सुधारतो आणि हे अडथळे कमी होतात,” असे. डॉ. हरिचरण म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/10

    ही खास डिझाइन केलेली उशी आहे, तजी तुम्ही झोपत असताना तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला आधार देण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/10

    “मूळ कल्पना म्हणजे तुमचे शरीर आणि डोके उंच ठेवा आणि तुमच्या वायुमार्गाचे संरेखन सुधारणा करा. हे तुमच्या घशाचे स्नायू आणि हवेचा प्रवाह रोखण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते, हे घोरण्याचे एक सामान्य कारण आहे,” असे परळ येथील ग्लेनेगल हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजी आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभाग संचालक डॉ. समीर गार्डे यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/10

    परंतु, डॉ. गार्डे यांनी सांगितले की, “प्रत्येकासाठी ही उशी आरामदायी वाटू शकत नाही. कदाचित त्याचा त्यांच्या झोपेच्या वेळेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/10

    डॉ. हरिचरण यांनी असेही नमूद केले की, वेज कुशन हलके ते मध्यम घोरणे कमी करू शकतात, परंतु ते सर्व आजारांसाठी फायदेशीर नाही. “जीवनशैलीतील बदल, जसे की वजन कमी करणे, झोपण्यापूर्वी अल्कोहोल टाळणे अशा काही गोष्टी वेज पिलोच्या वापरास पूरक असाव्या. गंभीर प्रकरणांमध्ये सीपीएपी (कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) सारखे वैद्यकीय उपचार आवश्यक असू शकतात. योग्य सल्ल्यासाठी नेहमी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/10

    “घोरण्यासंबंधित समस्या दूर करण्यासाठी वेज कुशनची परिणामकारकता व्यक्तीपरत्वे बदलू शकते. जर तुम्ही दीर्घकाळ घोरत असाल, तर घरगुती उपाय वापरण्याऐवजी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा” असे डॉ. गार्डे म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 10/10

    काही प्रकरणांमध्ये घोरणे विविध अंतर्निहित आरोग्य स्थिती दर्शवू शकते, जसे की लठ्ठपणा किंवा तीव्र अनुनासिक रक्तसंचय. या किरकोळ परंतु गंभीर स्थितीकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य कालांतराने खराब होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Can a pillow stop your snoring find out what the experts say sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.