-
प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांसाठी अनेक गोष्टी करतात. त्यांना चांगले अन्न, चांगले शिक्षण मिळावे यासाठी दिवस-रात्र कष्ट घेतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
याव्यतिरिक्त त्यांचे हट्टही पुरवतात. पण कधी कधी लहान मुलांचे हे हट्ट पुरवणे पालकांसाठी खूप आव्हानात्मक असते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
त्याशिवाय काही मुलं खूप रागीट, हट्टी व चिडखोर असतात. अशा मुलांच्या या स्वभावामुळे पालक सतत त्रस्त असतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
अशा मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
(फोटो सौजन्य: Freepik) -
तुमची मुलेही स्वभावाने हट्टी आणि चिडखोर झाली असतील, तर त्यांना पाहून लगेच रागवू नका. सर्वप्रथम शांत राहून त्यांच्या रागाचे कारण जाणून घ्या. मुलांना दररोज वेळ द्या; जेणेकरून मुलांना तुमच्यापासून वेगळे वाटणार नाही.
(फोटो सौजन्य: Freepik) -
मुलं जेव्हा हट्टी असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधायला हवा. मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावना काहीही असो, त्यांचा स्वीकार करा. तुम्हाला त्यांची काळजी आहे आणि तुम्ही त्यांची योग्य काळजी घेत आहात हेदेखील मुलांना जाणवून द्या.
(फोटो सौजन्य: Freepik) -
अनेक वेळा मुलं काहीतरी चांगलं करत असताना पालक त्यांचे मनोबल वाढवत नाहीत. पालकांनी आपल्या मुलांचे चांगल्या गोष्टींबाबत त्यांचे कौतुक केले पाहिजे. तुम्ही त्यांना काही बक्षिसेदेखील देऊ शकता. त्यामुळे मुलांना नेहमीच चांगले वागण्याची प्रेरणा मिळेल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुमच्या मुलाला कधीही राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल, तर त्याचे लक्ष एका ठिकाणाहून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. लक्ष वळवण्याच्या या तंत्रामुळे त्याचा हट्टीपणा कमी होईल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही मुलांकडे फारसे लक्ष देत नाही असे जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ती चिडचिड करतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. यावेळी, तुम्ही तुमच्या मुलासोबत त्यांचा आवडता खेळ खेळा किंवा त्यांना फिरायला घेऊन जा. (फोटो सौजन्य: Freepik)
चिडचिड करणाऱ्या मुलांवर ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
Child anger issues: काही मुलं खूप रागीट, हट्टी व चिडखोर असतात. अशा मुलांच्या या स्वभावामुळे पालक सतत त्रस्त असतात. अशा मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
Web Title: Control irritable children with these simple remedies sap