-
भारतातील अनेक पदार्थांमध्ये नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दक्षिण भारतीय अन्न पदार्थ असो किंवा कोकणी पदार्थ असो, नारळाशिवाय हे पदार्थ पूर्ण होत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
नारळाच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. अशा परिस्थितीत आरोग्यतज्ज्ञदेखील नारळाला आहाराचा एक भाग बनवण्याचा सल्ला देतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, अनेकांना नारळ सोलायला खूप वैताग येतो. कारण यामध्ये खूप वेळ वाया जातो. इतकंच नाही तर कधी कधी नारळाच्या वाटीतून नारळ काढायला एक तास लागतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत लोक वैतागून नारळ खाणंच टाळतात. तुम्हीदेखील या समस्येला सामोरे जात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त पाच मिनिटांत नारळाचे टरफल वेगळे करू शकाल. हा सोप्पा उपाय मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सर्वप्रथम नारळ फोडून त्याचे दोन तुकडे करा. यानंतर कवचाच्या बाजूने तुटलेला नारळ गॅसच्या आचेवर ठेवा आणि कवच काळे होईपर्यंत असेच राहू द्या. सुमारे दोन-तीन मिनिटांनंतर नारळाचा कवच काळा होईल, नंतर त्याला पकडीच्या मदतीने धरून ठेवा आणि थेट थंड पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता नारळ कवचाच्या आत आकुंचित होऊ लागतो, कवच किंचित थंड झाल्यावर चाकू घ्या आणि कवचाच्या आत हलवा. असे केल्याने नारळ टरफलेतून बाहेर पडेल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ही संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही जास्त मेहनत न घेता पाच मिनिटांच्या आत खोबरे काढून टाकू शकता. मात्र, या काळात काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
PM Narendra Modi US Visit LIVE: अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांबाबत मोदींनी ट्रम्प यांच्यासमोरच स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हे सर्व भारतीय…”