Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. japanese weight loss tips fat loss secrets 7 powerful japanese habits for natural weight loss longevity and a slimmer body sjr

Japanese Weight Loss Tips :जास्त मेहनत न करता वजन काही दिवसांत होईल कमी, फॉलो करा फक्त ‘या’ 7 जपानी टिप्स

Japanese Weight Loss Tips : जर तुम्हालाही नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या ७ प्रभावी जपानी टिप्सचा समावेश करू शकता.

February 8, 2025 18:58 IST
Follow Us
  • Traditional Japanese eating habits, Small plate method for portion control,
    1/9

    हळूहळू आणि आनंदाने खा.
    जपानी लोक खूप हळूहळू खातात आणि प्रत्येक घासाचा आनंद घेतात. हळूहळू खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते आणि मेंदूला पोट वेळेवर भरल्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे जास्त खाणे टाळण्यास मदत होते.

  • 2/9

    जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर लवकर किंवा घाईघाईने खाण्याची सवय पहिला सोडून द्या.

  • 3/9

    लहान भांडी आणि प्लेट्स वापरा.
    जपानमध्ये जेवण लहान वाट्या आणि प्लेट्समध्ये दिले जाते. यामुळे व्यक्ती जास्त न खाता विविध पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न खाऊ शकते. या टेक्निकचा वापर करून, तुम्ही संतुलित आहार घेऊ शकता आणि अनावश्यक कॅलरीजचे सेवन टाळू शकता.

  • 4/9

    दैनंदिन कामांमध्ये शारीरिक व्यायामाचा समावेश करा.
    जपानी लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींचा समावेश करतात. त्यांना चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणे आवडते. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर तुम्हाला तंदुरुस्त आणि उत्साही देखील ठेवते. जर तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या गोष्टींमुळे अधिक हालचाल करण्याची सवय लागते.

  • 5/9

    हारा हाची बु परंपरा
    जपानमध्ये ‘हारा हाची बु’ नावाची एक परंपरा आहे, ज्याचा अर्थ ‘फक्त ८०% पर्यंत खा.’ हे तत्व पोट पूर्णपणे भरण्यापासून रोखण्यास मदत करते, ज्यामुळे जास्त खाणे आणि पचन समस्या टाळता येतात. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर भूक भागवण्याऐवजी पोट थोडे भरेपर्यंत खा.

  • 6/9

    ग्रीन टी प्या.
    जपानमध्ये ग्रीन टी खूप लोकप्रिय आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील ती उपयुक्त मानली जाते. हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि अनावश्यक चरबी घटवण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कॉफी किंवा साखरयुक्त पेयांऐवजी तुमच्या दैनंदिन जीवनात ग्रीन टीचा समावेश करा.

  • 7/9

    ताजे आणि हंगामी अन्न खा.
    जपानी पाककृतीचा मोठा भाग ताज्या आणि हंगामी पदार्थांवर आधारित आहे. हंगामी फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि त्यांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करते.

  • 8/9

    कुटुंब आणि मित्रांबरोबर जेवण करा.
    जपानी संस्कृतीत सामाजिकरित्या खाण्याला खूप महत्त्व दिले जाते. ते कुटुंब आणि मित्रांबरोबर बसून जेवायला पसंती देतात. ज्यामुळे ते हळूहळू जेवण होते आणि संतुलित प्रमाणात अन्न पोटात जाते.

  • 9/9

    एकटे खाण्याच्या तुलनेत लोकांबरोबर मिळून जेवल्याने जास्त खाणे टाळता येते. जर तुम्हालाही जास्त प्रयत्न न करता वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही जपानी जीवनशैली आणि या प्रभावी टिप्सचा वापर करून तुमचे फिटनेस ध्येय साध्य करू शकता. (फोटो साभार: पेक्सेल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Japanese weight loss tips fat loss secrets 7 powerful japanese habits for natural weight loss longevity and a slimmer body sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.