-
परीक्षेच्या वेळी, अभ्यासाबरोबर चांगली झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्रत्येक व्यक्तीने दररोज ७ ते ९ तास झोप घेतली पाहिजे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत त्यांच्यासाठी योग्य वेळी झोपणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हे यशाची गुरुकिल्ली असू शकते. यासाठी सरे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या झोपेसंदर्भात शेअर केलेल्या ७ टिप्सच्या मदतीने परीक्षेत यश मिळवण्यास मदत होऊ शकते.
-
झोपेची वेळ निश्चित करा
दररोज एका निश्चित वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. सकाळी उठण्याची वेळ ठरवल्यावर, त्या वेळेपासून ७-९ तास मागे मोजा आणि त्यात अर्धा तास जोडा. झोपण्याची ही योग्य वेळ असेल. तुमच्या शरीराला चांगली झोप येण्यासाठी ही दिनचर्या नियमितपणे पाळा. -
तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या
रात्रीचे जेवण आणि झोपेमध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर ठेवा. दूध, केळी आणि अक्रोड यांसारखे काही पदार्थ चांगली झोप घेण्यास मदत करतात असे मानले जाते, कारण त्यात ट्रिप्टोफॅन असते, जे शरीराला मेलाटोनिन हार्मोन तयार करण्यास मदत करते. -
कॅफिनयुक्त पेये टाळा
कॅफिनमुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, म्हणून परीक्षेदरम्यान त्याचे सेवन मर्यादित करा. दुपारी ३ नंतर कॉफी, चहा, चॉकलेट आणि सोडा यासारखे कॅफिनयुक्त पदार्थ पिणे टाळा. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल आणि परीक्षेसाठी तुम्हाला ताजेतवाने वाटेल. -
झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरू नका
झोपण्यापूर्वी मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप वापरणे टाळा. या उपकरणांच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश तुमच्या शरीराच्या सर्काडियन लयावर परिणाम करू शकतो आणि मेलाटोनिन हार्मोनचे कार्य बिघडू शकते, ज्यामुळे झोप खराब होते. -
झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा
जर तुम्ही झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटनांचा विचार करत राहिलात तर तुमचे मन सक्रिय राहील आणि तुमच्या झोपेवर परिणाम होईल. त्याऐवजी, तुमचे विचार डायरीत लिहा जेणेकरून तुमचे मनाला हलके वाटेल. याव्यतिरिक्त, ध्यान आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम देखील झोप सुधारू शकतात. -
झोपण्यापूर्वी व्यायाम करू नका
व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी, झोपण्यापूर्वी दोन तास आधी व्यायाम करणे टाळा. व्यायामामुळे एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात, जे मेंदूला सक्रिय करू शकतात आणि झोपेवर परिणाम करू शकतात. -
एका रात्रीच्या वाईट झोपेमुळे घाबरू नका.
जर एखाद्या दिवशी तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर घाबरून जाण्याची गरज नाही. झोप ही एक स्वायत्त क्रिया आहे, जी जबरदस्तीने लादता येत नाही. म्हणून, कमी झोपेमुळे दुसऱ्या दिवशी तुमच्या कामगिरीवर परिणाम होईल असा विचार करून ताणतणाव घेऊ नका कारण हा ताण तुमची झोप आणखी खराब करू शकतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
Exam Tips: परीक्षेच्या काळात रात्रीची झोप पूर्ण होण्यासाठी रोजच्या सवयींमध्ये करा ‘हे’ ७ बदल; सकाळी उठल्यानंतर वाटेल एकदम फ्रेश
Exam Tips : परीक्षेदरम्यान चांगली झोप घेणे हे अभ्यासाइतकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही योग्य झोप घेता तेव्हा तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगली कामगिरी करण्यास मदत होते.
Web Title: Exam tips improve your exam performance with these 7 sleep tips from the university of surrey sjr