-
घरातील फरशीवर अनेकदा जेवणाचे डाग पडतात आणि ते निघायचं नाव घेत नाहीत. अनेक उपाय करूनही हे डाग तसेच दिसतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशावेळी तुम्ही घरच्या घरी लिक्विड क्लिनर तयार करून तुमची फरशी स्वच्छ करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
विशेष म्हणजे हे लिक्विड क्लिनर फरशीवरील घाण साफ करण्यास, घरात सुगंध वाढवण्यास आणि नंतर फरशी चमकण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
लिंबापासून लिक्विड क्लिनर बनवण्यासाठी लिंबू, गरम पाणी, बेकिंग सोडा हे साहित्य घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यानंतर लिक्विड क्लिनर बनवण्यासाठी लिंबू कापून गरम पाण्यात मिसळा आणि नंतर ते उकळवा.त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. आता त्यात बेकिंग सोडा घाला. आणि या पाण्याने फरशी पुसून टाका. (फोटो सौजन्य: Freepik)
-
लिंबाच्या लिक्विड क्लिनरमध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे फरशी स्वच्छ करण्यास मदत करते. याने पुसल्याने फरशी लवकर स्वच्छ होते. हे पाणी घाण आणि डाग साफ करण्यास उपयुक्त आहे. हे फरशीला चमक देण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
लिंबाचे लिक्विड क्लिनर फरशी स्वच्छ करण्यासाठी आणि संपूर्ण घराला सुगंध देण्यासाठी उपयुक्त आहे. या लिंबाचा सुगंध संपूर्ण घरात पसरतो. अशा प्रकारे तुम्ही लिंबाचे क्लिनर वापरून तुमच्या फरशीची चमक वाढवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
याशिवाय, तुम्ही व्हिनेगर फ्लोअर क्लिनरदेखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त व्हिनेगर घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळायचा आहे, यामुळे फरशी स्वच्छ होते आणि ती पूर्णपणे चमकते. (फोटो सौजन्य: Freepik) -
तर या टिप्स वापरून पाहा, ज्यामुळे फरशी साफ करणे सोपे होईल. याशिवाय तुम्ही ते बनवून बराच काळ साठवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
फरशीवरील काळे, पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ सोप्या उपायाने फरशी करा चकाचक
Lemon liquid cleaning solution: घरच्या घरी लिक्विड क्लिनर तयार करून तुमची फरशी स्वच्छ करू शकता. विशेष म्हणजे हे लिक्विड क्लिनर फरशीवरील घाण साफ करण्यास, घरात सुगंध वाढवण्यास आणि नंतर फरशी चमकण्यास मदत करते.
Web Title: Simple the solution to wear black yellow stains on the floor sap