Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. experts say the cause of pain in the shoulder after diabetes sap

तज्ज्ञांनी सांगितले मधुमेह झाल्यावर खांद्यामध्ये होणाऱ्या वेदनांचे कारण; घ्या जाणून…

Shoulder Pain: मधुमेहींमध्ये दीर्घकालीन सूज आल्यामुळे खांद्याचे दुखणेदेखील वाढते, जे आईएल-६ नावाच्या प्रो-इंफ्लेमेटरी सायटोकिन्सच्या वाढत्या पातळीमुळे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.

Updated: March 15, 2025 14:50 IST
Follow Us
  • मधुमेह हे एक हत्यार आहे असे म्हटले जाते. कारण तो व्यक्तीच्या आयुष्यातील गोडवा नाहीसा करतोच, शिवाय अनेक आरोग्य समस्यांसह व्यक्तीच्या आयुष्यात शिरकाव करतो. (फोटो सौजन्य: Freepik)
    1/9

    मधुमेह हे एक हत्यार आहे असे म्हटले जाते. कारण तो व्यक्तीच्या आयुष्यातील गोडवा नाहीसा करतोच, शिवाय अनेक आरोग्य समस्यांसह व्यक्तीच्या आयुष्यात शिरकाव करतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट-न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, खांद्याचे दुखणे हे सामान्यतः ॲडहेसिव्ह कॅप्सुलायटिस (फ्रोजन शोल्डर) मुळे होते आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ही एक सामान्य स्थिती आहे, ज्यांना पक्षाघात झाला आहे (स्ट्रोकमुळे) त्यांनादेखील खांद्याचे दुखणे होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    त्यांनी पुढे सांगितले की, फिजिओथेरपी आणि ओटीसी वेदनाशामक बहुतेक प्रकरणांमध्ये उपयुक्त आहेत. मात्र, जर वेदना कायम राहिल्या तर नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. शुभम वात्स्य यांच्या मते, मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांमध्ये सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या पण सामान्य समस्यांपैकी स्नायूंची समस्या, ज्यामध्ये खांदेदुखीचा समावेश आहे.

  • 5/9

    “मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत उच्च रक्तातील साखरेची पातळी (हायपरग्लाइसेमिया) संयोजी ऊतींमध्ये असलेल्या कोलेजन किंवा इतर संरचनात्मक प्रथिनांचे ग्लायकेशन होते आणि यामुळे ऊतींची लवचिकता कमी होते आणि खांद्यांमध्ये वेदना सुरू होतात, ज्यामुळे खांद्याच्या गतिशीलतेवर परिणाम होतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    त्यांनी सांगितले की, मधुमेहींच्या स्नायूंच्या वस्तुमानात अनेकदा घट होते, ज्याला डायबेटिक मायोपॅथी म्हणतात, ज्यामुळे टेंडन्स आणि लिगामेंट्सवर अधिक ताण येतो, ज्यामुळे खांद्याची ताकद कमी होते आणि त्यांची गतिशीलता कमी होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9


    मधुमेहींमध्ये दीर्घकालीन सूज आल्यामुळे खांद्याचे दुखणेदेखील वाढते, जे आईएल-६ नावाच्या प्रो-इंफ्लेमेटरी सायटोकिन्सच्या वाढत्या पातळीमुळे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    वेदनेवर उपचार करण्यासाठी डॉ. वात्स्य यांनी सांगितले की, नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs) घेतले जाऊ शकतात आणि जर वेदना तीव्र असतील तर इंजेक्शनच्या स्वरूपात कॉर्टिकोस्टिरॉईड्स दिली जाऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    “जर मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण कमी असेल तर ते खांद्याचे दुखणे वाढवते, त्यामुळे पुरेशी हायपोग्लायसेमिक औषधे, शारीरिक हालचाली आणि आहाराद्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Experts say the cause of pain in the shoulder after diabetes sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.