• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is it beneficial to eating caramel leaves sap

कारल्याची पाने खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

karela leaves health benefits: कारल्याची पानं अ व क जीवनसत्त्वं, तसेच फोलेट, पोटॅशियम व लोह यांसारख्या खनिजांसह आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असतात.

March 16, 2025 14:40 IST
Follow Us
  • karela leaves health benefits
    1/9

    कारले असंख्य आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे; परंतु त्याची पानं पोषक घटकांचा एक उत्कृष्ट खजिना आहेत. अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजांनी परिपूर्ण असलेली कारल्याची पाने विविध उपायांसाठी वापरली जातात आणि आता आधुनिक आहारातही ती त्याच्या संभाव्य भूमिकेसाठी लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा ​​यांनी दी इंडियन एक्स्प्रेसडॉटकॉमला सांगतात, “कारल्याची पानं अ व क जीवनसत्त्वं, तसेच फोलेट, पोटॅशियम व लोह यांसारख्या खनिजांसह आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असतात.”(फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    त्या म्हणतात की, या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
    ही पानं रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
    मधुमेह व्यवस्थापनात साह्य करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    उच्च फायबर सामग्री पचनास उपयुक्त ठरून, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करतात.ही पानं क जीवनसत्त्वानं समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मग साहजिकच संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढून आणि कोलेजन उत्पादनास समर्थन देऊन, निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतात.
    त्यात कॅलरीज कमी; पण फायबर जास्त असल्यामुळे तृप्ती वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    यकृताच्या कार्याला चालना मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत झाल्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    मल्होत्रा ​​म्हणतात, आहारात कारल्याच्या पानांचा समावेश करताना, विशेषतः मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अनेक खबरदारी घेणं आवश्यक आहे. प्रथम, मधुमेह असलेल्यांनी रक्तातील साखरेच्या पातळीचं बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    कारण- कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, ज्यामुळे मधुमेहाच्या औषधांसह घेतल्यास हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते. प्रतिकूल प्रतिक्रिया टाळण्यासाठी याची सुरुवात करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    “तुम्ही केळी किंवा सफरचंद यांसारख्या फळांच्या स्मूदीमध्येही कारल्याची पानं मिसळून त्यांचा कडूपणा लपवू शकता आणि आरोग्यदायी फायदे वाढवू शकता. तसेच मीठ आणि मसाल्यांनी मळलेले पानांचे पातळ काप भाजून किंवा एअर-फ्राय करून, तुम्ही कुरकुरीत नाश्त्यासाठी कारल्याच्या पानांचे चिप्सही बनवू शकता.
    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Is it beneficial to eating caramel leaves sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.