• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drinking an ash gourd juice daily to weight lose sap

दररोज कोहळ्याचा रस प्यायल्याने वजन कमी होते? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…

Ash Gourd Juice: कोहळा ही कमी कॅलरीजची भाजी आहे, ज्यामध्ये भरपूर फायबर आहे आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी तो एक उत्तम पर्याय आहे.

April 5, 2025 13:26 IST
Follow Us
  • Drinking an ash gourd juice daily
    1/9

    अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, दररोज सलगपणे तीन आठवडे कोहळ्याच्या (ash gourd) रसाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पण हे खरे आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9


    ‘सॅटविक मूव्हमेंट’च्या सह-संस्थापक सुबा सराफ यांच्या मते, जर एखाद्या महिलेने तीन आठवडे दररोज कोहळ्याच्या रसाचे सेवन केले, तर तिचे पोट कमी होईल आणि दीर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होईल. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने पोषण तज्ज्ञांना विचारण्याचे ठरवले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा ​​म्हणाल्या, “कोहळा ही कमी कॅलरीजची भाजी आहे, ज्यामध्ये भरपूर फायबर आहे आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी तो एक उत्तम पर्याय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9


    त्यातील उच्च फायबरमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुमची खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन प्रभावीपणे कमी करण्यासाठी ती महत्त्वाची बाब आहे.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्यातील उच्च फायबर सामग्री पचनास मदत करू शकते आणि तृप्ती वाढवू शकते. वजन व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांना समर्थन देते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9


    “कोहळ्याचा रस त्याच्या नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठीदेखील ओळखला जातो, जो पाण्याचे प्रमाण कमी करण्यास आणि पोट फुगण्यास मदत करतो; ज्यामुळे तीन ते चार आठवड्यांत तुमचे पोट सपाट होते”, असे मल्होत्रा ​​म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    “याव्यतिरिक्त, ते पाचक एंझाइम उत्तेजित करून आणि बद्धकोष्ठता व आम्लता यांसारख्या समस्यांपासून मुक्त होऊन निरोगी पचनास मदत करते. त्याचे अल्कधर्मी स्वरूप पोटातील आम्ल पातळी संतुलित करते, पचन सुरळीत करते आणि जेवणानंतर अस्वस्थता कमी करते,” असे मल्होत्रा ​​म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9


    “त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, चयापचय वाढवतात आणि कालांतराने व्हिसरल फॅट कमी करण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स तुमच्या आहारात एक उत्तम भर घालू शकतात. परंतु, दीर्घकालीन परिणामांसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित जेवण योजनेसह हा उपाय करणे आवश्यक आहे,” असे मल्होत्रा ​​यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    जीवनसत्त्वे , खनिजे व अँटिऑक्सिडंट्स यांनी भरलेले हे कमी कॅलरीजयुक्त पेय त्याच्या थंड गुणधर्मांसाठीदेखील ओळखले जाते, ज्यामुळे हे पेय उष्ण हवामानात संक्रमणादरम्यान शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी एक आदर्श पर्याय ठरतो.
    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Drinking an ash gourd juice daily to weight lose sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.