• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 10 unique gi tagged indian sweets and the stories behind them jshd import rak

Indian Sweets with GI Tag : ‘या’ १० भारतीय मिठाईंना मिळाला आहे GI टॅग, तुम्ही त्या चाखल्या आहेत का?

Indian Sweets with GI Tag : GI टॅग असलेल्या मिठाई त्यांच्या अनोख्या चवीसाठी आणि उत्पादन पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. चला, भारतातील १० खास GI-टॅग मिळालेल्या मिठाईंबद्दल जाणून घेऊया ..

April 26, 2025 01:17 IST
Follow Us
  • GI-Tagged Sweets in India
    1/13

    भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे प्रत्येक राज्याची स्वत:ची खासियत आहे – मग ती भाषा असो, कपडे असो किंवा स्वादिष्ट जेवण असो. मिठाईंबद्दल बोलायचे झाले तर, भारतात अनेक पारंपारिक मिठाई तयार केल्या जातात ज्यांना GI टॅग (जिओग्राफीकल इंडिकेशन टॅग) मिळालेला आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/13

    एखादी मिठाई ही केवळ त्याच विशिष्ट भौगोलिक प्रदेशात बनत अशेल आणि त्या प्रदेशातील परंपरा आणि घटकांचा वापर करून ती तयार केली जात असेल तर तिला हा टॅग दिला जातो. आज आपण भारतातील अशाच १० खास मिठाईंबद्दल जाणून घेऊया ज्यांना GI टॅग मिळाला आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/13

    सिलावचा खाजा (बिहार)
    बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील सिलाव भागात हा कुरकुरीत गोड पदार्थ मुरारिया गहू, गूळ आणि देशी तूपापासून बनवला जातो. याची अनोखी चव त्याला खास बनवते.(छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 4/13

    वर्धमान येथील मिहिदाना (पश्चिम बंगाल)
    ही बारीक बुंदीसारखा गोड पदार्थ गोविंदभोग किंवा कामिनीभोग तांदळापासून बनवला जातो जो फक्त वर्धमान या प्रदेशात पिकवला जातो. त्याची चव सौम्य आणि सुगंधी असते. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 5/13

    श्रीविल्लीपुथुर येथील पल्कोवा (तामिळनाडू)
    १० लिटर दुधापासून बनवलेला हा गोड पदार्थ तामिळनाडूतील श्रीविलीपुथूरची खासियत आहे. हा पदार्थ फक्त दूध आणि साखर वापरून बनवले जाते आणि त्याची चव मलाईदार असते. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 6/13

    वर्धमान येथील सीताभोग (पश्चिम बंगाल)
    ही भातासारखी गोड डिश लहान गुलाब जामुनच्या तुकड्यासह दिली जाते. हा पदार्थ देखील गोविंदभोग तांदळाच्या पिठापासून बनवला जातो आणि ही एक अतिशय अनोखी मिठाई आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 7/13

    जयनगरेर मोया (पश्चिम बंगाल)
    फक्त हिवाळ्यात बनवला जाणारा हा गोड पदार्थ कनकाचूर तांदूळ आणि नोलन गूळ (खजूरापासून बनवलेला गूळ) वापरून तयार केली जाते. त्याची चव आणि सुगंध खूप खास असतो. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 8/13

    धारवाड पेडा (कर्नाटक)
    धारवाडमधील हा पेडा उत्तर प्रदेशातून आलेल्या ठाकूर कुटुंबाने पहिल्यांदा बनवला होता. आज हा पेढा कर्नाटकची ओळख बनला आहे आणि त्याची रेसिपी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 9/13

    बंगालचा रसगोल्ला
    २०० वर्षांपूर्वी नवीन चंद्र दास यांनी तयार केलेल्या या रसगोल्लाची बनावट, रंग आणि गोडी ओडिशाच्या रसगुल्ल्यापेक्षा खूपच वेगळी आहे. त्याला जीआय टॅग मिळाला आहे आणि हा पदार्थ बंगालची एक खास ओळख आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 10/13

    ओडिशा रसगुल्ला
    ओडिशातील हा रसगुल्ला त्याच्या तोंडात विरघळणाऱ्या टेक्सचरसाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्पंजसारखी बनावट आणि सौम्य गोडवा त्याला एक वेगळी ओळख देतो. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 11/13

    कोविलपट्टी कडालाई मिटाई (तामिळनाडू)
    कोविलपट्टीमध्ये बनवलेला हा गोड पदार्थ गूळ आणि भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनवला जातो. हा एक आरोग्यासाठी चांगला आणि चविष्ट पदार्थ म्हणून खूप लोकप्रिय आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 12/13

    तिरुपती लाडू (आंध्र प्रदेश)
    तिरुमला मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या या लाडूंना GI टॅग मिळालेला आहे. हे ‘पोटू’ नावाच्या एका खास ठिकाणी शुद्ध देशी तुपापासून बनवले जातात. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

  • 13/13

    गोव्याचे खाजे
    जरी ते पहिल्या दहामध्ये नसला तरी हा पदार्थ विशेष आहे. हा पदार्थ गूळ, आले आणि तीळापासून बनवला जातो, हा कुरकुरीत गोड पदार्थ आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodमराठी बातम्याMarathi News

Web Title: 10 unique gi tagged indian sweets and the stories behind them jshd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.