• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. india top hill station visit in summer travel tips feeling of paradise south tour in gujarati ap ieghd import rak

Summer Tourist Places : हिरव्यागार दऱ्या अन् थंड हवा, उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे हिल स्टेशन आहे बेस्ट

Summer Tourist Places : जर तुम्हाला उन्हाळ्याच्या कडक उन्हात प्रवास करायचा असेल तर तुम्ही दक्षिण भारतात या ठिकाणी जाऊ शकता.

April 29, 2025 01:19 IST
Follow Us
  • Summer Tourist Places जर तुम्हाला उन्हाळ्याच्या कडक उन्हात प्रवास करायचा असेल तर तुम्ही दक्षिण भारतात प्रवास करू शकता. विशेषतः उटी हे पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. ऊटी हे तामिळनाडूमधील सर्वोत्तम हिल स्टेशनपैकी एक आहे. हे सुंदर निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले असून स्वच्छ हवामान आणि हिरव्यागार टेकड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. उटीच्या आजूबाजूला इतरही अनेक आकर्षणे आहेत. धबधबे आणि चहाच्या बागांपासून ते शांत तलाव आणि वारसा स्थळांपर्यंत, ऊटीभोवतीची प्रत्येक गोष्ट आकर्षणाचे केंद्र आहे. चला तर मग उटी आणि त्याच्या जवळील काही सर्वोत्तम ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. (छायाचित्र- विकिपीडिया)
    1/9

    Summer Tourist Places जर तुम्हाला उन्हाळ्याच्या कडक उन्हात प्रवास करायचा असेल तर तुम्ही दक्षिण भारतात प्रवास करू शकता. विशेषतः उटी हे पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. ऊटी हे तामिळनाडूमधील सर्वोत्तम हिल स्टेशनपैकी एक आहे. हे सुंदर निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले असून स्वच्छ हवामान आणि हिरव्यागार टेकड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. उटीच्या आजूबाजूला इतरही अनेक आकर्षणे आहेत. धबधबे आणि चहाच्या बागांपासून ते शांत तलाव आणि वारसा स्थळांपर्यंत, ऊटीभोवतीची प्रत्येक गोष्ट आकर्षणाचे केंद्र आहे. चला तर मग उटी आणि त्याच्या जवळील काही सर्वोत्तम ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 2/9

    कुन्नूर: ऊटीच्या खाली कुन्नूर नावाचे आणखी पर्यटनस्थळ आहे जे निलगिरीचा एक भाग आहे. येथे तु्म्ही डोंगरांवर पसरलेल्या हिरव्या गालिच्यांसारखे दिसणारे विस्तीर्ण चहाचे बाग पाहू शकता. निसर्गप्रेमी सिम्स पार्क, लॅम्ब्स रॉक आणि डॉल्फिन नोज व्ह्यूपॉइंट सारख्या ठिकाणी भेट देऊ शकतात. ऊटीहून कुन्नूरला येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक गोष्ट ही टॉय ट्रेनचा प्रवास असून तुम्ही यामधून अत्यंत सुंदर निसर्ग सौंदर्य पाहू शकता. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 3/9

    पायकारा तलाव आणि धबधबा: पायकारा तलाव घनदाट जंगलांनी वेढलेल्या शांत वातावरणात येथे तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता. अनेक धबधब्यांसह हिरवळीच्या मध्ये येथे तुम्हाला पायकारा धबधबा पाहायला मिळतो. उटीच्या जवळ तु्म्ही या धबधब्याला भेट देऊ शकता. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 4/9

    कोटागिरी: गर्दीच्या पर्यटन स्थळांपासून दूर, कोटागिरी हे ठिकाण स्वाभाविकच वेगळे ठरते. तर हे छोटेसे हिल स्टेशन धुक्याने झाकाळलेल्या पर्वतांवर आणि हिरव्यागार दऱ्या आणि असंख्य चहाच्या बागांनी वेढलेले आहे. कोडनाड ट्रेक सारख्या लोकप्रिय ट्रेल्स व्यतिरिक्त, इथे इतरही निसर्ग सौंदर्याने भरलेले ट्रेक्स तुम्ही करू शकता. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 5/9

    एमराल्ड लेक: हे एक गर्दीपासून दूर वसलेले ठिकाण आहे आणि ऊटीपासून सुमारे २० किमी अंतरावर नीलम गावाजवळ आहे. चहाच्या बागा आणि घनदाट जंगलांनी वेढलेला हा शांत तलाव आरामात फिरण्यासाठी किंवा निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. याशिवाय, हे अनेक पक्ष्यांचे घर आहे, त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 6/9

    अ‍ॅव्हलांच लेक: ज्यांना काहीतरी वेगळे करायचे आहे त्यांच्यासाठी अ‍ॅव्हलांच लेक हा एक उत्तम पर्याय असेल. हे शांत ठिकाण घनदाट जंगले आणि उंच पर्वतांनी वेढलेले आहे, ज्यामुळे ते निसर्ग प्रेमींसाठी एक फरफेक्ट डेस्टीनेशन ठरते. अ‍ॅव्हलांचमध्ये तु्ही शांत वातावरणात ट्रेकिंग, कॅम्पिंग किंवा ट्राउट फिशिंगसारख्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 7/9

    दोड्डाबेट्टा शिखर: दोड्डाबेट्टा शिखर हे निलगिरीतील इतर सर्व शिखरांपेक्षा उंच आहे आणि येथून दऱ्या, चहाच्या बागा आणि खाली दूरच्या मैदानांचे सौंदर्य पाहाया मिळते. खरं तर, ऊटीपासून फक्त १० किमी अंतरावर असल्याने, तुम्ही रस्त्याने तिथे पोहोचू शकता. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 8/9

    नीडल रॉक व्ह्यूपॉइंट: या आकर्षक जागेचे नाव येथे असलेल्या सुईच्या आकाराच्या खडकावरून पडले आहे, येथे गेल्यावर तुम्ही खाली असलेल्या उंच टेकड्या आणि दऱ्यांचे सुंदर दृश्य पाहू शकता. ऊटीपासून सुमारे ५० किमी अंतरावर गुडालूर जवळ असलेले नीडल रॉक व्ह्यूपॉइंट नावाचे हे ठिकाण सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघते, म्हणूनच छायाचित्रकार सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी रंगांनी न्हाऊन निघालेल्या दृश्यांचे आश्चर्यकारक फोटो काढण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. (छायाचित्र- विकिपीडिया)

  • 9/9

    ग्लेनमॉर्गन: ग्लेनमॉर्गन हे ऊटीपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे आणि ते त्याच्या विस्तीर्ण चहाच्या बागांसाठी आणि सुंदर परिसरासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक चहाच्या बागांमधून आरामात फिरू शकतात आणि वातावरणातील शांततेचा आनंद घेऊ शकतात. कॅथरीन फॉल्सकडे जाणारा ग्लेनमॉर्गन ट्रॅक पर्यटकांना निसर्गाचा एक संस्मरणीय अनुभव देतो. (छायाचित्र- सोशल मीडिया)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: India top hill station visit in summer travel tips feeling of paradise south tour in gujarati ap ieghd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.