-
काही लोक खूप पटापट खातात, ही सवय आरोग्यासाठी हानिकारक असू शकते; ज्यामुळे पोटदुखी, गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अन्न जेव्हा पटापट खाल्ले जाते, तेव्हा पोट अस्वस्थ होते आणि अन्न पचन होण्यास समस्या निर्माण होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पटापट अन्न खाताना तुम्ही जास्तीची हवा गिळता म्हणून हे घडते. जेव्हा अन्न व्यवस्थित चावले जात नाही तेव्हा ते पचवण्यासाठी तुमच्या पोटाला जास्त मेहनत करावी लागते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
यामुळे अपचन आणि ॲसिडिटी होऊ शकते; यामुळे तुमच्या मेंदूला तुमचे पोट भरले आहे की नाही हे ओळखण्यासदेखील अडथळा येतो, यामुळे जास्त खाण्याची आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तज्ज्ञांच्या मते, पटापट खाण्यामुळे पचनावर अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे आम्लयुक्त रिफ्लक्स आणि पोटात तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. “यामुळे तुमचे चयापचयदेखील मंदावू शकते, म्हणूनच आरोग्याला प्राधान्य देणे आणि हळूहळू खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
”तुम्ही अन्न खाताना हळूहळू चावून खा तसेच पटापट जेवण्यासाठी मोठे घास चावून खाणे टाळा. अन्न नेहमी शांत वातावरणात खाणे उपयुक्त ठरू शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तसेच, ,”जेवणादरम्यान पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे तुमचे पोट लवकर भरू शकते. त्याऐवजी पचनास मदत करण्यासाठी जेवणाच्या २० ते ३० मिनिटे आधी पाणी पिण्याचा प्रयत्न करा,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
खाण्याच्या सवयींमध्ये साधे बदल केल्याने आतड्याच्या आरोग्यावर आणि दीर्घकालीन आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
अन्न पटापट खाणं आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ काय सांगतात..
Fast Eating: पटापट खाण्यामुळे पचनावर अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे आम्लयुक्त रिफ्लक्स आणि पोटात तीव्र वेदना होण्याची शक्यता असते.
Web Title: Is eating food quickly harmful to health what do experts say sap