-
२०२५ चा मातृदिन यावेळी रविवार, ११ मे रोजी भारतात साजरा केला जाईल. हा दिवस आईच्या निःशर्त प्रेमाचा, त्यागाचा आणि समर्पणाचा सन्मान करण्याची सर्वात खास संधी आहे. एक जुनी म्हण आहे – “देव सर्वत्र असू शकत नव्हता, म्हणून त्याने आईला बनवले.” हे खरे आहे की, आई ही ती शक्ती आहे जी संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी न थकता किंवा न थांबता दिवसरात्र काम करते. (Photo Source: Pexels)
-
खरंतर मदर्स डे हा केवळ एक दिवस नाही तर दररोज साजरा केला पाहिजे येथे आम्ही काही भेटवस्तूंच्या आयडिया घेऊन आलो आहोत ज्या आपल्या भारतीय मातांच्या आवडी, स्वभाव आणि जीवनशैली लक्षात घेऊन तयार केल्या आहेत. (Photo Source: Pexels)
-
पारंपरिक भेटवस्तू
साडी किंवा सूट सेट: बनारसी साड्या, चिकनकारी कुर्त्या किंवा हातमागाच्या शाल आणि ओढणी आईला खूप आवडू शकतात. (Photo Source: Pexels) -
दागिने: मुलाचे नाव लिहिलेल्या अंगठ्या किंवा लॉकेटसारखे जुने किंवा कस्टमाइज्ड दागिने भावनिक स्पर्श देणाऱ्या ठरतात. (Photo Source: Pexels)
-
वैयक्तिक आणि भावनिक भेटवस्तू
फोटो फ्रेम किंवा स्क्रॅपबुक: कुटुंबातील आठवणी सजवून एक सुंदर अल्बम किंवा फ्रेम तयार करता येते. (Photo Source: Pexels) -
कस्टमाइज्ड हॅम्पर: तिचा आवडता चहा, स्नॅक्स, स्किनकेअर प्रॉडक्ट आणि त्यावर एक सुंदर नोट लिहून एक छानसा गिफ्ट बॉक्स तयार करता येईल. (Photo Source: Pexels)
-
आरोग्याची काळजी घेण्यासाठी भेटवस्तू
स्पा किट: आवश्यक तेल, बॉडी लोशन, फेस मास्कस, आरामदायी स्पा हॅम्पर्स द्याल तर आईला खूप आवडेल. (Photo Source: Pexels) -
फिटनेस गिफ्ट्स: योगा मॅट, हेल्दी स्नॅक्स, ग्रीन टी किंवा ऑनलाइन योगा क्लासचे सदस्यत्व परचेस करून त्यांना निरोगी जीवनशैलीसाठी पाठिंबा देता येईल. (Photo Source: Pexels)
-
आध्यात्मिक
पूजा थाळी किंवा मूर्ती: लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, तुळशीचे रोप किंवा सुंदर पूजा थाळी भेट दिली तर आईला आध्यात्मिक समाधानाची भावना मिळेलं. (Photo Source: Pexels) -
पर्यावरणपूरक भेटवस्तू: घरातील रोपे, पर्यावरणपूरक बॅग्ज, बांबूच्या वस्तू. (Photo Source: Pexels)
-
मजेदार आणि गोड भेटवस्तू
केक आणि चॉकलेट : गोड मदर्स डे साजरा करण्यासाठी आईच्या नावाचा केक ऑर्डर करता येईल, तसेच त्यावर हर्ट शेपचे छोटे चॉकलेट वापरता येईल. (Photo Source: Pexels) -
मग आणि कार्ड्स : मजेदार कोट्स आणि पॉप-अप कार्ड्स असलेले मग तुम्ही आईला भेट देऊ शकता जे तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आणतील. (Photo Source: Pexels)
Mother’s Day 2024: यंदा आईसाठी काय खरेदी करावे? असा प्रश्न पडलाय? पाहा १० सर्वोत्तम आणि अनोख्या भेटवस्तूंच्या आयडिया…
Mother’s Day Gift Ideas for Indian Moms: यंदाच्या ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तुम्हालाही तुमच्या लाडक्या आईला एखादे गिफ्ट देण्याची इच्छा असेल. पाहा १० सर्वोत्तम आणि अनोख्या भेटवस्तूंच्या आयडिया…
Web Title: Mothers day 2025 culturally rich and heartfelt gift ideas for your indian mom spl