Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. this mothers day pamper her with love comfort and care best gifts to celebrate your mom spl

मातृदिनाला तुमच्या प्रेमळ आईला ‘या’ आधुनिक भेटवस्तू द्या आणि तिच्या आरोग्याचीही काळजी घ्या…

Best Gifts for Mom: तुमच्या आईच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या काही भेटवस्तूंच्या आयडिया जाणून घ्या…

May 10, 2025 18:58 IST
Follow Us
  • unique gifts for mom 2025
    1/9

    आई – एक असा शब्द आहे जो सांत्वन, त्याग आणि प्रेमाचा अर्थ आपल्याला समजवतो. दरवर्षी मदर्स डे येतो आणि आपण तिला शुभेच्छा देण्यासाठी बुके, केक आणि ग्रीटिंग कार्ड्सपुरते मर्यादित राहतो. पण यावेळी, तिला असे काहीतरी का देऊ नये जे केवळ तिच्या चेहऱ्यावर हास्य आणणार नाही तर तिचे जीवन देखील चांगले बनवेल? या मदर्स डे निमित्त, आईसाठी संस्मरणीय ठरू शकणाऱ्या काही खास भेटवस्तूंबद्दल जाणून घेऊया.

  • 2/9

    ५ इन १ मल्टीस्टाईलिंग किट
    जर तुमच्या आईला हेअर स्टायलिंगची आवड असेल, तर ५-इन-१ मल्टीस्टायलिंग किट ही एक तिच्यासाठी उत्तम भेट असू शकते. त्यात ब्रशचा कंगवा, कर्लर, स्ट्रेटनर आणि क्रिम्पर असे ५ वेगवेगळे अटॅचमेंट आहेत, ज्यामुळे ती दररोज एक नवीन लूक तयार करू शकते. हे स्टायलिंग किट केवळ सोयीचे नाही तर केसांच्या आरोग्याची देखील काळजी घेते. (Photo Source: havells.com)

  • 3/9

    ऑल-इन-वन किचन रोबोट
    जर तुमच्या आईला स्वयंपाक करायला आवडत असेल, तर ऑल-इन-वन किचन रोबोट तिचे काम आणखी सोपे करू शकतो. हा स्वयंपाकघरातील रोबोट कापणे, मळणे, परतणे आणि शिजवण अशी मल्टिपल कामे करतो, त्यामुळे तुमच्या आईला स्वयंपाक करताना त्रास होणार नाही, तसेच तिला वेळही मिळेल. (Photo Source: wonderchef.com)

  • 4/9

    ब्लेंडर
    ही ब्लेंडर मशीन एक स्मार्ट आणि स्टायलिश भेट वस्तू असू शकते. हे ब्लेंडर पोर्टेबल आहे आणि मॅग्नेटिक इंडक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे जलद आणि सहजपणे ज्यूस बनवते. ही मशीनही तुमच्या आईला भेट म्हणून देता येईल. (Photo Source: wonderchef.com)

  • 5/9

    एअर फ्रायर
    या एअर फ्रायरमध्ये ७ प्री-सेट फंक्शन्स आहेत, जे आईच्या जेवणाची चव आणि त्यासोबतच तिच्या आरोग्याचीही काळजी घेतील. (Photo Source: wonderchef.com)

  • 6/9

    पाय मालिश करण्यासाठी
    आता आईचा दिवसभराचा थकवा दूर करणे सोपे झाले आहे. हा नवा फूट मसाजर जबरदस्त मालिश करतो, ज्यामुळे रक्ताभिसरण निट होते आणि वेदनाही कमी होतात. यात ४ ऑटोमॅटिक प्रोग्राम्स आणि ३ कस्टम मोड्स आहेत, ज्यामुळे आईचा रोजचा थकवा काही मिनिटांतच नाहीसा होईल. (Photo Source: amazon.in)

  • 7/9

    फुल बॉडी मसाजर
    जर तुमच्या आईचीही वारंवार पाठ, खांदा किंवा मान दुखत असेल, तर हा फुल बॉडी मसाजर एक उत्तम भेट ठरू शकतो. त्याचे ३डी नीडिंग रोलर्स आणि शियात्सु मसाज तंत्रज्ञान आईला हाताने मसाज करण्याचाच अनुभव देईल. त्याची हीटिंग आणि इन्फ्रारेड थेरपी वैशिष्ट्ये थकवा दूर करतील. (Photo Source: amazon.in)

  • 8/9

    हाताने बनवलेल्या भेटवस्तू
    तुम्ही स्वतः बनवलेली कोणतीही भेटवस्तू सर्वात खास असते. स्मार्ट कटिंग मशीन आणि टूल्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईसाठी कार्ड, बॅग किंवा आठवणींनी भरलेले स्क्रॅपबुक तयार करू शकता. काही वेगळे केले तर आई ही भेटवस्तू कधीही विसरणार नाही. (Photo Source: amazon.in)

  • 9/9

    गादी
    गादी हाही एक उत्तम पर्याय असू शकतो. या गादीचे ५डी स्लीपटेक तंत्रज्ञान पाठीच्या कण्याला संरेखित करण्यास मदत करते, ज्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो. ही गादी फक्त भेटवस्तू नाही तर आईला वेदनारहित झोप देण्याचाही एक उत्तम पर्याय आहे. (Photo Source: livpure.com)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: This mothers day pamper her with love comfort and care best gifts to celebrate your mom spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.