-
प्रोटीन हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो स्नायूंची निर्मिती, वाढ आणि दुरुस्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. डॉ. आयलीन कॅन्डे यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमला सांगितले की, दीर्घकाळापर्यंत प्रोटीनचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ज्यामुळे शरीरातील कचरा चयापचय करण्यासाठी जबाबदार असलेल्या अवयवांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या, रक्तवाहिन्यांच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडांना दुखापत होऊ शकते, तसेच टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यालाही धोका वाढू शकतो,” (फोटो सौजन्य: Freepik)
-
“निरोगी लोकांना त्यांच्या प्रोटीनचे सेवन दुप्पट किंवा तिप्पट करण्याची आवश्यकता नाही. सामान्यतः शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोक, जसे की खेळाडू, जीममध्ये जाणारे, गर्भवती, स्तनपान देणारी महिला, कर्करोगासाठी वैद्यकीय उपचार घेत असलेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या लोकांना प्रति किलो शरीराच्या वजनासाठी एक ग्रॅमपेक्षा जास्त आवश्यक असते, परंतु हे प्रमाण पोषणतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांनी लिहून दिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
शरीराची कार्यपद्धती टिकवून ठेवण्याची एक अनोखी पद्धत आहे, ज्यामध्ये धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी चेतावणी देणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik) -
जास्त प्रोटीन सेवन केल्याने तुमच्या मूत्रपिंडांना प्रथिने चयापचयातील उत्पादने बाहेर काढण्यासाठी जास्त काम करावे लागू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. यात तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त तहान लागल्याचे किंवा गडद रंगाची लघवी होत असल्याचे दिसून येईल. (फोटो सौजन्य: Freepik) -
प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने अनेकदा फायबरचे सेवन कमी होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि अस्वस्थता येऊ शकते. मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे योग्य संतुलन न ठेवता तुमच्या आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते. (फोटो सौजन्य: Freepik) -
खूप जास्त प्रोटीनयुक्त, कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार तुमच्या शरीराला केटोसिसच्या अवस्थेत आणू शकतो, ज्यामुळे तोंडाची चांगली स्वच्छता असूनही अनेकदा दुर्गंधी येते. (फोटो सौजन्य: Freepik) -
प्रोटीन बहुतेकदा वजन कमी करण्याशी संबंधित असतात, परंतु त्यातील प्रोटीन जास्त प्रमाणात वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. जर शरीराला ऊर्जेसाठी किंवा दुरुस्तीसाठी त्वरित गरज नसेल तर जास्तीचे प्रोटीन चरबी म्हणून साठवले जातात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)
प्रोटीनचे अधिक सेवन आरोग्यासाठी त्रासदायक आहे का?
Excessive Protein Intake Is Harmful: दीर्घकाळापर्यंत प्रोटीनचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Web Title: Is excessive protein intake harmful to health sap