Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. travel tips secret behind no clocks in hotel rooms svk

प्रवास टिप्स : हॉटेलच्या खोल्यांत घड्याळ नसण्यामागचं गुपित – ९०% लोकांना माहीत नाही यामागचं कारण

हॉटेलच्या खोल्यांमध्ये घड्याळे नाहीत: तुम्ही हॉटेलच्या खोल्यांना अनेकदा भेट दिली असेल, पण भिंतींवर घड्याळे का नाहीत किंवा खोलीत घड्याळ का नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

June 12, 2025 13:45 IST
Follow Us
  • प्रवास टिप्स : हॉटेलच्या खोलीत घड्याळ नसते, का? लक्ष दिलंय कधी?हॉटेलमध्ये चेक-इन करताना आपण पाण्याची बाटली, बेडचं आरामदायकपण, टेलिफोनसारख्या सेवा पाहतो. पण, एक गोष्ट आपण बहुतांशवेळी चुकवतो – खोलीत भिंतीवर घड्याळ असतंच असं नाही. ही छोटीशी गोष्टही तुमच्या प्रवासाच्या अनुभवावर परिणाम करू शकते. पुढच्या वेळी हॉटेलमध्ये थांबलात, तर भिंतीकडेही नजर टाका. (फोटो-फ्रीपिक)
    1/6

    प्रवास टिप्स : हॉटेलच्या खोलीत घड्याळ नसते, का? लक्ष दिलंय कधी?
    हॉटेलमध्ये चेक-इन करताना आपण पाण्याची बाटली, बेडचं आरामदायकपण, टेलिफोनसारख्या सेवा पाहतो. पण, एक गोष्ट आपण बहुतांशवेळी चुकवतो – खोलीत भिंतीवर घड्याळ असतंच असं नाही. ही छोटीशी गोष्टही तुमच्या प्रवासाच्या अनुभवावर परिणाम करू शकते. पुढच्या वेळी हॉटेलमध्ये थांबलात, तर भिंतीकडेही नजर टाका. (फोटो-फ्रीपिक)

  • 2/6

    कधी लक्ष दिलंय? हॉटेलच्या खोलीत घड्याळ नसतं… का बरं?
    चित्रं, दिवे, सजावट – सगळं असतं, पण भिंतीवर घड्याळ मात्र नसतं. तुम्ही कधी विचार केलात का यामागचं कारण काय असेल? शक्यता आहे की तुम्ही हे पाहिलंच नसेल… किंवा पाहिलं असेल पण लक्ष दिलं नसेल. आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत, हॉटेल्समध्ये घड्याळे का नसतात याचं खरं कारण. (फोटो-फ्रीपिक)

  • 3/6

    हॉटेल्स : सगळं काही आहे… पण घड्याळ कुठे?
    आजची हॉटेल्स केवळ झोपण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. इथे स्वादिष्ट जेवण, आरामदायक स्पा, स्विमिंग पूल आणि इव्हेंट्ससाठी खास जागा. सगळं काही मिळतं, पण या सर्व आकर्षक गोष्टींमध्ये एक बाब तुम्ही चुकवत असाल… खोलीत घड्याळ कुठे आहे? विचार केलात कधी? कदाचित नाहीच! पण, पुढच्या वेळी हॉटेलमध्ये थांबलात तर एकदा भिंतीकडे नक्की पाहा. (फोटो-फ्रीपिक)

  • 4/6

    खरं पाहिलं तर हे काही चुकून झालेलं नाही. हॉटेल मालक मुद्दामच खोलीत घड्याळ ठेवत नाहीत, कारण सोप्पं आहे. पाहुण्यांनी वेळेच्या चिंता न करता पूर्ण विश्रांती घ्यावी, सुट्टीचा खरा आनंद घ्यावा हाच हेतू. वेळ पाहत राहिलात तर मन तसंच गुंतून राहतं, म्हणूनच, पुढच्या वेळी घड्याळ दिसलं नाही तरी नवल वाटू देऊ नका. तीच तर विश्रांतीची खरी गुरुकिल्ली आहे. (फोटो-फ्रीपिक)

  • 5/6

    हॉटेल्सचा उद्देश असतो, तुम्ही तणावमुक्त वातावरणात निवांतपणे वेळ घालवावा. पण, जर तुम्ही सतत घड्याळाकडे पाहत राहिलात तर नकळत तुम्ही घाईच्या आणि चिंतेच्या मानसिकतेत अडकता, म्हणूनच खोलीतून घड्याळ दूर ठेवून हॉटेल्स तुम्हाला एका वेगळ्याच ‘स्लो मोड’मध्ये घेऊन जातात. जिथे वेळ नाही, फक्त विश्रांती आणि अनुभव असतो. (फोटो-फ्रीपिक)

  • 6/6

    हॉटेल मालकांचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय – तुमच्या आरामासाठी!
    खोलीत घड्याळ नसणं ही काही चूक नाही, तर हॉटेल मालकांनी मुद्दाम घेतलेली विचारपूर्वक निवड असते. यामागे फक्त सुविधा देण्याचा नव्हे, तर तुमच्या विश्रांतीचा आणि खासगीपणाचा आदर करण्याचा हेतू असतो; त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खोलीत घड्याळ शोधाल तेव्हा हे लक्षात ठेवा. इथल्या लोकांना तुमचा आराम खरोखरच महत्त्वाचा वाटतो. (फोटो-फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Travel tips secret behind no clocks in hotel rooms svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.