• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. stay cool in summer with these 7 refreshing drinks svk

अति उष्णतेतही राहा फ्रेश! ‘हे’ ७ देशी पेये शरीराला देतात नैसर्गिक थंडावा

अति उष्णतेमध्ये शरीराला आतून थंड ठेवणे महत्वाचे आहे. काही देशी पेये अशी आहेत जी शरीराचे तापमान कमी करण्यास आणि शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात.

June 14, 2025 17:44 IST
Follow Us
  • Drinks to keep you cool in summer
    1/9

    कडक उन्हात बाहेर पडणं म्हणजे आपल्या शरीरासाठी एक मोठं आव्हान. तीव्र सूर्यप्रकाश आणि तापमानामुळे शरीर जलदगतीने डिहायड्रेट होतं, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. अशा वेळी केवळ पाणी पुरेसं नाही. शरीराला गरज असते अशा पेयांची, जे थेट आतून थंडावा देतील आणि पाण्याची कमतरताही भरून काढतील. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःला फ्रेश आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे पेये ठरू शकतात तुमचे खरे रक्षक. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 2/9

    उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आपल्या परंपरेत काही अशी खास देशी पेये आहेत, जे फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक आहेत. हे पारंपरिक भारतीय शीतपेये शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या नियंत्रित करतात आणि हायड्रेशनची कमतरता दूर करून तुम्हाला तरतरीत ठेवतात. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 3/9

    १. ताक
    ताक शरीराला आतून थंडावा देतं आणि हायड्रेट करतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ते एक उत्कृष्ट पर्याय आहे. म्हणूनच, उन्हाळ्यात नियमितपणे ताक पिणं फायदेशीर ठरतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 4/9

    २. आंब्याचं पन्हं
    प्राचीन काळापासून लोक कच्च्या आंब्यापासून तयार केलेलं आंब्याचं पन्हं उन्हाळ्यात नियमितपणे पितात. व्हिटॅमिन C, B आणि लोहाने भरलेलं हे पेय शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतं आणि उष्माघाताचा धोका कमी करतं. शिवाय, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही पन्हं एक उत्तम पर्याय आहे. (फोटो: फ्रीपिक)

  • 5/9

    ३. नारळ पाणी
    उन्हाळ्यात नारळ पाणी पिणं म्हणजे शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक घेणं! हे आयसोटोनिक पेय शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित ठेवतं आणि हायड्रेशन वाढवतं. पोटॅशियमने भरपूर असलेलं नारळ पाणी शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतं, ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि ऊर्जावान राहता. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 6/9

    ४. सत्तू
    भारतात सत्तूचं सेवन ही जुनी आणि प्रभावी परंपरा आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत. सत्तूपासून तयार केलेलं पेय शरीराला त्वरित ऊर्जा देतं आणि पोटाला थंडावा मिळवून देतं. हे देसी सुपरफूड केवळ शरीराला आतून थंड ठेवत नाही, तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासही मदत करतं. उन्हाळ्याच्या उष्णतेशी लढण्यासाठी सत्तूपेक्षा चांगला पर्याय नाही. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 7/9

    ५. ऊसाचा रस
    उन्हाळ्यात ऊसाचा रस म्हणजे ऊर्जा आणि थंडाव्याचा परिपूर्ण संगम! तो शरीराची ऊर्जा पातळी नैसर्गिकरित्या वाढवतो आणि आतून थंडावा देतो. यामुळे उष्माघातचा धोका कमी होतो. गोडसर चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे ऊसाचा रस उन्हाळ्यातील ‘must-have’ पेय ठरतं. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 8/9

    ६. लिंबू पाणी
    कडक उन्हात लिंबू पाणी हे एक अतिशय सोपं पण प्रभावी पेय आहे. ते शरीराचं तापमान कमी करतं आणि तुम्हाला आतून फ्रेश ठेवतं. याशिवाय, चयापचय (metabolism) वाढवण्यासही मदत करतं. रोजचं लिंबू पाणी म्हणजे उन्हाळ्यातील नैसर्गिक ‘refreshing boost’! (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 9/9

    ७. बेलाचा रस
    लोह, फायबर आणि व्हिटॅमिन C ने भरपूर असलेला बेलाचा रस उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देतो. त्याचे नियमित सेवन केल्यास उष्माघाताचा धोका लांब राहतो आणि शरीर ताजं व ऊर्जावान वाटतं. (फोटो: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Stay cool in summer with these 7 refreshing drinks svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.