• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. make these delicious and cooling breakfast recipes to stay fresh and energy in summer svk

उन्हाळ्यात नाश्त्यासाठी स्वादिष्ट आणि पोटाला थंड ठेवणारे ‘हे’ पदार्थ बनवा…

जड, तेलकट नाश्त्यामुळे पोटफुगी, आळस आणि अपचन होऊ शकते, असे पोषणतज्ञ म्हणतात.

June 14, 2025 15:46 IST
Follow Us
  • breakfast ideas
    1/9

    सकाळची सुरुवात डिहायड्रेशन, थकवा आणि ऊर्जेच्या कमतरतेने होते का? खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तीव्र असतो आणि शरीर आधीच गारवा शोधत असते.
    एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील न्यूट्रिशनिस्ट एडविना राज सांगतात, जड आणि तेलकट नाश्ता केल्याने पोटफुगी, आळस आणि अपचन होऊ शकते, त्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी हलके, आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक चांगले. (स्रोत: फ्रीपिक)

  • 2/9

    उन्हाच्या दिवसात नारळाच्या पाण्याची स्मूदीसारखी ताजगी काहीच देऊ शकत नाही! फक्त ताजं नारळाचं पाणी, केळी, पुदिन्याची पाने आणि थोडं बर्फ आणि तयार झाली तुमची परिपूर्ण कूलिंग स्मूदी.
    कार्बोनेटेड पेयांपेक्षा हा नैसर्गिक पर्याय अधिक फायदेशीर. न्यूट्रिशनिस्ट एडविना राज सांगतात, नारळाचं पाणी इलेक्ट्रोलाइट्सने भरलेलं असतं, तर केळी नैसर्गिक गोडवा आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. (स्रोत: फ्रीपिक)

  • 3/9

    जेवण बनवण्याची आवड असेल तर चिया बियाण्यांसह फळांची ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.
    ही डिश केवळ बनवायला सोपी नाही, तर शरीरासाठीही खूप फायद्याची आहे. पोषणतज्ज्ञ सुचवतात की, चिया बियाणे रात्रभर बदाम किंवा नारळाच्या दुधात भिजवावेत आणि सकाळी त्यावर ताज्या बेरी, किवी किंवा पपईसारखी हंगामी फळं घालावीत.
    चिया बियाणे त्यांच्या थंडाव्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात आणि ते पचनासाठीही हलके असतात,” असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे ही डिश तुमच्या दिवसाची सुरुवात हलकी, ताजीतवानी आणि समाधानकारक करते. (स्रोत: फ्रीपिक)

  • 4/9

    उन्हाळ्यात थंडाव्याची झुळूक हवी असेल तर ओट्स आणि ताकाचा हा संयमित पर्याय एकदम योग्य.
    ओट्स पाण्यात शिजवा आणि थंड झाल्यावर त्यात गार ताक मिसळा. चव वाढवण्यासाठी फक्त चिमूटभर मीठ किंवा भाजलेले जिरे घाला. बस्स!
    न्यूट्रिशनिस्ट राज सांगतात, ओट्स हलके आणि तंतुमय असतात, तर ताक पोटाला आराम देते आणि पचनास मदत करते. (स्रोत: फ्रीपिक)

  • 5/9

    उन्हाळ्यात ताजेतवाना आणि पोटासाठी हलका पर्याय हवा असेल, तर काकडीचा रायता नक्की ट्राय करा.
    बारीक चिरलेली काकडी साध्या दह्यात मिसळा, त्यात थोडं मीठ आणि जिरे पावडर घाला.
    न्यूट्रिशनिस्ट राज सांगतात, दही हे प्रोबायोटिक पॉवरहाऊस असून आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर काकडी शरीराला अतिरिक्त थंडावा देते. (स्रोत: फ्रीपिक)

  • 6/9

    उन्हाळ्यात शरीराला आतून शांतता हवी असेल, तर अ‍ॅलोवेरा ड्रिंक हा उत्तम पर्याय आहे.
    न्यूट्रिशनिस्ट राज यांची शिफारस. ताज्या अ‍ॅलोवेरा जेलमध्ये थोडं पाणी आणि एक चमचा मध मिसळा.
    हे ड्रिंक रिकाम्या पोटी किंवा हलक्या नाश्त्यासोबत घेतल्यास शरीराला गारवा मिळतो आणि पचनसंस्थेलाही मदत होते. (स्रोत: फ्रीपिक)

  • 7/9

    त्या म्हणाल्या, कोरफडीचा थंडावा आणि दाहक-विरोधी गुणधर्म पाचनतंत्रासाठी खूपच उपयुक्त ठरतात. (स्रोत: फ्रीपिक)

  • 8/9

    राज सांगतात, मऊसर वाफवलेल्या इडल्या आणि ताज्या नारळाच्या चटणीसह घेतला जाणारा नाश्ता हा उन्हाळ्यासाठी एक परिपूर्ण, हलका आणि थंडावा देणारा पर्याय आहे.
    त्यांच्या मते, आंबवलेल्या इडल्या पचनास मदत करतात, तर नारळ शरीरातील उष्णता आणि जळजळ कमी करण्यास उपयोगी ठरतो.
    उन्हाच्या दिवसाची सुरुवात करा हलक्याश्या, पण पौष्टिक आणि शांतता देणाऱ्या नाश्त्याने. (स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/9

    उन्हाळ्यात ताजेतवाना आणि पचनास मदत करणारा पर्याय हवा आहे? मग आहारात पपईचे सॅलेड नक्की समाविष्ट करा.
    राज यांच्यानुसार, पपईचे चौकोनी तुकडे करा आणि त्यावर ताज्या लिंबाचा रस पिळा. एक साधं पण आरोग्यदायी सॅलेड तयार.
    पपईमध्ये असलेलं पपेन हे एंजाइम प्रथिने पचवायला मदत करतं आणि पोटाला आराम देतं, त्यामुळे गरम दिवसांमध्ये हा नाश्ता परिपूर्ण ठरतो. (स्रोत: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Make these delicious and cooling breakfast recipes to stay fresh and energy in summer svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.