-
आजच्या जलदगती जीवनशैलीमुळे अनेकांना एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे, सततचा मानसिक ताण आणि थकवा यांचा सामना करावा लागतो. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होतो. मात्र, या सर्व समस्यांवर एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणजे ‘योग.’ योग केवळ शरीर तंदुरुस्त ठेवत नाही, तर मनालाही स्थिर आणि शांत ठेवतो. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते, मन शांत होते आणि तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मक होतं.
-
आजच्या तणावग्रस्त वातावरणात मन स्थिर ठेवणं ही एक मोठी गरज बनली आहे. योगाच्या मदतीने आपण केवळ शरीराला नव्हे, तर मनालाही शांत आणि स्थिर करू शकतो. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा कोणतेही काम लक्षपूर्वक आणि परिणामकारक पद्धतीने करता येतं.
जर तुम्हाला एकाग्रता वाढवायची असेल तर काही खास योगासने तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. खाली अशाच काही प्रभावी योगासनांची यादी दिली आहे, जी नियमित केल्यास तुमचं मन स्थिर होईल आणि एकाग्रता लक्षणीयपणे वाढेल. -
वृक्षासन : मन आणि शरीराचा समतोल!
एका पायावर स्थिर उभं राहून, दुसरा पाय मांडीवर ठेवून आणि हात डोक्यावर जोडल्याने केले जाणारं हे आसन एकाग्रता आणि शारीरिक संतुलन वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दररोज फक्त काही मिनिटे वृक्षासन करा आणि मनःशांतीचा अनुभव घ्या. -
ताडासन : स्थिर शरीर, शांत मन!
ही साधी उभं राहण्याची योगस्थिती शरीराची ठेवण योग्य तर्हेने करते आणि पाठीचा कणा सरळ राखते. संतुलन साधताना मन केंद्रित राहतं, त्यामुळे मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता वाढते. दररोजचा काही मिनिटांचा सराव मोठा फरक घडवतो. -
फुलपाखरू आसन : लवचिक शरीर, शांत मन!
दोन्ही पाय जोडून, गुडघे फडफडवत बसण्यातून तयार होणारं हे आसन शरीर लवचिक करतं आणि मन शांत करतं. खोल श्वासांसोबत हे आसन केल्याने लक्ष केंद्रित राहतं आणि एकाग्रता वाढते. मानसिक ताजेपणासाठी रोज काही मिनिटांचा सराव पुरेसा आहे.
International Yoga Day 2025: एकाग्रता वाढवण्यास ‘हे’ योग करतील मदत; दररोज केल्याने मिळतील प्रचंड फायदे
आजच्या धावपळीच्या जीवनात, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्या लोकांसाठी सामान्य झाल्या आहेत, त्यामुळे योग हा पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग ठरू शकतो, ज्यामुळे मानसिक शांती आणि एकाग्रता देखील सुधारते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणता योग करावा हे येथे जाणून घ्या?
Web Title: International yoga day 2025 yoga to improve focus daily practice for a sharper mind svk 05